घरक्राइमKpop Band स्टार मूनबिन याचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात आढळला मृतदेह

Kpop Band स्टार मूनबिन याचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात आढळला मृतदेह

Subscribe

अॅस्ट्रो मेंबर मूनबिनचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. दक्षिण कोरियाच्या अनेक आऊटलेट्सने मूनबिनच्या निधनाची माहिती दिली आहे. कोरियाबूच्या एका अहवालानुसार, के- पाॅप आयडल सियोलमधील गंगनम-गु येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला.

अॅस्ट्रो मेंबर मूनबिनचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. दक्षिण कोरियाच्या अनेक आऊटलेट्सने मूनबिनच्या निधनाची माहिती दिली आहे. कोरियाबूच्या एका अहवालानुसार, के- पाॅप आयडल सियोलमधील गंगनम-गु येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. मूनबिनने आत्महत्या केल्याच प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ( Kpop Band Star Moonbin s Suspicious Death A dead body was found in a residential house )

मूनबिनची आत्महत्या आहे की कोणत्या आजारामुळे हा मृत्यू झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियातील एका मनोरंजन पोर्टलने दावा केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, मूनबिनने आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूनबिन 19 एप्रिल रोजी रात्री 8:10 च्या सुमारास त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर व्यवस्थापकाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. अॅस्ट्रो युनिट सदस्य मूनबिनचा 13 मे रोजी एक कार्यक्रम होता.

( हेही वाचा: या यूट्यूब चॅनल विरोधात आराध्या बच्चनची दिल्ली उच्च न्यायालयात धाव )

- Advertisement -

( हेही वाचा: अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल; महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण )

या घटनेनंतर आयोजकांनी एक निवदेन जारी करुन कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली आहे. आयोजकांनी म्हटले आहे की, आम्ही जड अंत: करणाने तुम्हाला कळवू इच्छितो की 2023 मूनबोन आणि सानहा फ‌ॅन काॅन टूर: 13 मे रोजी जकार्ता येथे होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मूनबिनच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्याच्या अचानक निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. मोठ्या प्रमाणात त्याचे चाहते सोशस मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -