घरमनोरंजनIndianIdol 12:जेवढी जास्त चर्चा तेवढी TRP मध्ये वाढ, कुमार सानूची वादात एंट्री

IndianIdol 12:जेवढी जास्त चर्चा तेवढी TRP मध्ये वाढ, कुमार सानूची वादात एंट्री

Subscribe

शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या कंटेटवर अनेक पुर्व स्पर्धकांनी तसेच परिक्षकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करत शो फक्त टिआरपी खेचण्यासाठी फेक कंटेटे दाखवत असल्याचे वक्तव्य केलं होतं

छोट्या पडद्यावरील जेवढा प्रसिद्ध मानला जाणार पण तितकाच वादाच्या भोवऱ्यात अडकणार हिंदी रियालिटी सिंगिग शो म्हणजे ‘इंडियन आयडल १२’ सध्या जोरदार चर्चेत आहे.  शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या ड्रामामुळे सर्वचजण वैतागले आहेत. यामुळे शो मधिल मेकर्सवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे तसेच शो मधिल स्पर्धक तसेच परिक्षक आणि होस्टसुद्धा ट्रोलिंगपासून वाचले नाहीत. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या कंटेटवर अनेक पुर्व स्पर्धकांनी तसेच परिक्षकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करत शो फक्त टिआरपी खेचण्यासाठी फेक कंटेटे दाखवत असल्याचे वक्तव्य केलं होतं. आता या वादात ९०च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड प्लेबॅक सिंगर कुमार सानू यांनी देखिल ऊडी मारली आहे. कुमार सानू यांनी शो बाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

कुमार सानू यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलावा संदर्भात त्यांचे मत प्रकट केले होते. आणि याचवेळेस कुमार सानू यांना इंडियन आयडल . शो बाबत प्रश्न विचारण्यात आला होता की “तुम्हाला असे वाटते का या शोमध्ये टॅलेंटला प्रोत्साहन दिले जाते?” त्यावर उत्तर देत कुमार सानू म्हणाले होते की , ‘जेवढी जास्त चर्चा होणारा, तेवढचं जास्त प्रमाणात TRP वाढणार हे लक्षात घ्या. ही मोठी गोष्ट नाही. टॅलेंट असेल तर तुम्हाला योग्य मार्ग मिळतोच आणि या शोच्या माध्यमातून अनेक टॅलेंटेड गायक इंडस्ट्रीला मिळाले आहेत. इंडियन आयडलच नाही तर सर्वच शो असे असतात. स्पर्धकांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी गायकांना मिळते. असे होऊ शकते की त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळू शकली नाही. पण या मंचामुळे त्यांना काहीतरी काम मिळाले आणि पैसा कमावण्याची संधी देखिल मिळू शकते’ असं वक्तव्य कुमार सानू यांनी केलं आहे.


हे हि वाचाप्रेग्नेंसीच्या चर्चांवर पूनम पांडेने केला खुलासा, म्हणाली आई होणे आनंदाची बाब आहे

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -