घरमनोरंजन'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार 'लाल सिंह चड्ढा'; कमी भावात झाला करार

‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘लाल सिंह चड्ढा’; कमी भावात झाला करार

Subscribe

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाला पुढच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचे होते. मात्र चित्रपटाची वाईट अवस्था पाहून निर्मात्यंनी चित्रपटाला ओटीटीवर लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा बहुचर्चित आणि वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी तोंडावर पाडलं. 180 कोटींचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने केवळ 60-80 कोटींपर्यंतची कमाई केली. हा चित्रपट आमीर खानच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा चित्रपट होता, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने हा आमीरच्या आयुष्यातील फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. दरम्यान, आता येत्या काळात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘लाल सिंह चड्ढा’
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला पुढच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचे होते. मात्र चित्रपटाची वाईट अवस्था पाहून निर्मात्यंनी चित्रपटाला ओटीटीवर लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ‘लाल सिंह चड्ढा’ 20 ऑक्टोबर 2022 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आमीर खान नेटफ्लिक्सकडे 150 कोटींची मागणी करत होता. मात्र नेटफ्लिक्सने 80 कोटींपर्यंत देण्याचे सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून आमीरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे हा चित्रपट जवळपास 100 कोटींची कमाई देखील करू शकला नाही.

‘लाल सिंह चड्ढा’ विरोधात कोर्टात याचिका दाखल
मागील काही दिवसांपूर्वी वकील नाजिया इलाही खानने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते बंगालचे वातावरण, ते सध्या धार्मिक मुद्द्यांवरून अस्थिर आहे आणि चित्रपटामध्ये भारतीय सैन्य दाल व्यवस्थित दाखवण्यात आलं नाही. ज्यामुळे चुकिचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे याचिकेमध्ये लाल सिंह चड्ढावर बंगालमध्ये बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा :

अमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -