घरमनोरंजनअमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल

अमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल

Subscribe

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. अशातच आता या चित्रपटावर जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बंगालमध्ये या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

आमीर खानचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ला होणार विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. आता याचं दरम्यान, कोलकत्ता उच्च न्यायालयामध्ये लाल सिंह चड्ढाबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे नेमक प्रकरण?
‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. अशातच आता या चित्रपटावर जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बंगालमध्ये या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या व्यतिरिक्त याचिकेमध्ये सांगण्यात आलं आहे, जर या चित्रपटावर बहिष्कार टाकला गेला नाही. तर ज्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट दाखवला जाईल, त्या चित्रपटगृहाबाहेर पोलिसांची पोस्टिंग नक्की असेल. तसेच या याचिकेच्या मते या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे बंगालमधील शांतता भंग होऊ शकते.
या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी मुख्य न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव कोर्टामध्ये करतील.

- Advertisement -

कोणी दाखल केली याचिका?
सूत्रांच्या माहितीनुसार, वकील नाजिया इलाही खानने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर एक जनहित याचिका दाखल केली आहे. त्याच्या मते बंगालचे वातावरण, ते सध्या धार्मिक मुद्द्यांवरून अस्थिर आहे आणि चित्रपटामध्ये भारतीय सैन्य दाल व्यवस्थित दाखवण्यात आलं नाही. ज्यामुळे चुकिचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे याचिकेमध्ये लाल सिंह चड्ढावर बंगालमध्ये बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार नाही ‘लाल सिंह चड्ढा’
सध्या प्रेक्षकांचा कल मोठ्या प्रमाणात ओटीटीकडे पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट कालांतराने ओटीटीवर देखील प्रदर्शित केले जातात. मात्र लाल सिंह चड्ढा चे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहून आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लाल सिंह चड्ढा’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून नेटफ्लिक्सने लाल सिंह चड्ढासोबत केलेला करार रद्द केला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :विशेष : नाशिकचे सांस्कृतिक वैभव अवघ्या ३ रंगमंदिरांमध्ये बंदिस्त

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -