घरमनोरंजनकॅन्सर पेशंट्ससाठी लाईव्ह इन कॉन्सर्ट

कॅन्सर पेशंट्ससाठी लाईव्ह इन कॉन्सर्ट

Subscribe

‘अमितकुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अमित कुमार यांनी त्यांचे वडील व प्रख्यात गायक किशोर कुमार यांना वाहिलेली एक विशेष अशी आदरांजली आहे. त्या माध्यमातून ‘कॅन्सर पेशंट्स अ‍ॅन्ड असोसिएशन’ (सीपीएए)साठी निधीसंकलन केले जाणार आहे. हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृह येथे २० ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

अमित कुमार हे भारतीय पार्श्वसंगीत क्षेत्रातील एक आघाडीचे पार्श्वगायक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. १९९५ पासून ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा करत आले आहेत. त्यांनी जगभरात कार्यक्रम केले आहेत आणि करत असतात. हिंदीबरोबरच त्यांनी बंगाली, भोजपुरी, ओडिसा, आसामी, मराठी आणि कोकणी या भाषांमध्येही गायन केले आहे.

- Advertisement -

अमित कुमार म्हणतात, मी सामाजिक कामांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिलो आहे. त्या माध्यमातून समाजामध्ये बदल घडवून आणण्यावर माझा भर असतो. सीपीएएबरोबर सहकार्य करत असल्याचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे उभे राहतील त्यांचा वापर गरीब घरातील आणि कर्करोगाने ग्रस्त महिलांवरील उपचार व मदतीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा शक्य असते तेव्हा समाजाचे देणे फेडण्याचा माझा प्रयत्न असतो. संगीत हा जनजागृती करण्याचे आणि सामाजिक काम करण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.

कॅन्सर पेशंट्स अ‍ॅन्ड असोसिएशन (सीपीएए) ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून गेली ४९ वर्षे ती कर्करोग्यांच्या कल्याणाप्रती कार्यरत आहे. संस्था आपल्या रुग्णांना विनामूल्य औषधे, अन्न, अ‍ॅम्बुलन्स सेवा, कृत्रिम अवयव पुरविते आणि इतर रोगांच्या चाचण्यांमध्येही सहकार्य करते. अशाप्रकारे रोगाचे संपूर्ण व्यवस्थापन संस्थेद्वारे केले जाते.

- Advertisement -

सीपीएएच्या कार्यकारी संचालिका श्रीमती अनिता पिटर म्हणाल्या, स्तन आणि सर्व्हायकल हे भारतातील दोन आघाडीचे कर्करोग आहेत. या रोगांच्या उपचारांसाठी जो खर्च अपेक्षित असतो तो पाहता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे उभे राहतील त्यातून गरीब घरातील कर्करोगाने ग्रस्त महिलेवर उपचार करण्यासाठी एक कायमस्वरूपी फंड निर्माण करण्यास मदत होईल. त्यातून त्यांना आपले आयुष्य सन्मानाने जगणे शक्य होईल.

खास करून स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे आणि त्यासाठी निधी संकलन करणे ही बाब आमच्यासाठी महत्वाची असते. त्यासाठी आम्ही या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी लोकांना विनंती करत असतो. अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पाठबळ देण्याची विनंती त्याद्वारे केली जाते, असेही श्रीमती पिटर म्हणाल्या.

कर्करोगग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठीचा हा कार्यक्रम क्लब महिंद्रतर्फे सादर होत आहे. लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) आणि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (एनआयएसी) आणि जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (जीआयसी) या कंपन्यांचे पाठबळ या कार्यक्रमाला आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असेल आणि त्यासाठीच्या प्रवेशिका २४९२४००० आणि २४९२६९२८ या फोन क्रमांकांवर उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -