घरमनोरंजनलोपामुद्रा राऊतची बॉलीवूड एंट्री सलमानबरोबर

लोपामुद्रा राऊतची बॉलीवूड एंट्री सलमानबरोबर

Subscribe

लोपामुद्रा लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असून तिचा हिरो सलमान खान असल्याची माहिती मिळत आहे. सलमान खान हा बिग बॉसचा निवेदक होता आणि त्यानं वेळोवेळी लोपामुद्राच्या खेळाची स्तुती केली होती.

मिस इंडियामध्ये दुसरी रनर अप आणि बिग बॉसमधील स्पर्धक लोपामुद्रा राऊतला आता नव्या ओळखीची गरज नाही. लोपामुद्रा सोशल मीडियावरील सेन्सेशन आहे. लोपामुद्रा लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असून तिचा हिरो सलमान खान असल्याची माहिती मिळत आहे. सलमान खान हा बिग बॉसचा निवेदक होता आणि त्यानं वेळोवेळी लोपामुद्राच्या खेळाची स्तुती केली होती. मात्र तिला इतकी मोठी संधी मिळेल असं कोणालाही आतापर्यंत वाटलं नसल्यामुळं ही बातमी खरी असल्यास, लोपामुद्राला एक प्रकारे लॉटरीच लागली आहे.

सायको थ्रिलर चित्रपटातून होणार पदार्पण

लोपामुद्रा सायको थ्रिलर चित्रपट ‘ब्लड स्टोरी’मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत हेगडे करणार असून हिचकॉकवरून हा चित्रपट प्रेरित असल्याची माहिती आहे. लोपामुद्राचा हिरो म्हणून सध्या पहिली पसंती सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे लोपा

व्यावसायिक चित्रपटांसह आर्ट फिल्ममध्येही काम करण्याची इच्छा असल्याचं एका मुलाखतीमध्ये लोपामुद्रानं सांगितलं होतं. त्यामुळं बॉलीवूडमधल्या बऱ्याच लोकांबरोबर तिला काम करायचं आहे. लोपाला स्वतःला सस्पेन्स चित्रपट आवडत असल्यामुळंच तिला सस्पेन्स चित्रपटात काम करायचं होतं. चित्रपटात काम करणं हे नवं आव्हान असून या नव्या अनुभव आणि आव्हानासाठी आपण तयार असल्याचं लोपानं सांगितलं आहे.

लोकांना चित्रपट आवडेल – लोपामुद्रा

चित्रपटाची कथा चांगली असून हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल अशी आशा लोपामुद्रानं व्यक्त केली आहे. पुढे नक्की काय होणार याचा अंदाज शेवटपर्यंत लोकांना येणार नाही असंही लोपामुद्रानं यावेळी नमूद केलं आहे. लोपामुद्रानं ‘बिग बॉस’नंतर ‘खतरों के खिलाडी’मध्येदेखील चांगला परफॉर्मन्स दाखवत सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -