घरमनोरंजनमकरंद अनासपुरेंनी न्यायव्यवस्थेला केली हात जोडून विनंती म्हणाले...

मकरंद अनासपुरेंनी न्यायव्यवस्थेला केली हात जोडून विनंती म्हणाले…

Subscribe

मकरंद अनासपुरेंनी हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर व्यक्त केला सात्विक संताप!

हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी या घटनेवर सात्विक संताप व्यक्त केला आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले, हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. हीच न्यायव्यवस्थेला आणि केंद्र शासनाला हात जोडून विनंती आहे. संबंधित तरूणीचा मृत्यू हा दूर्देवी असून हळहळ वाटत आहे. काही कारण नसताना एखाद्याला जीव द्यावा लागत आहे याबद्दल एक सात्विक संताप देखील होत आहे असे अनासपुरे म्हणाले.

'हैद्राबाद पोलिसांचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये'

'हैद्राबाद पोलिसांचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 10, 2020

- Advertisement -

 

हिंगणघाट जळीतकांडातील भगिनीच्या दुदैवी मृत्यूची बातमी ऐकून खूप हळहळ वाटत आहे. एक सात्विक संताप देखील होत आहे की, कोणत्याही कारणा शिवाय अशा वाईट पद्धतीने एखाद्याला जीव द्यावा लागतोय. ही समाजासाठी फार दुर्देवाची गोष्ट आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की अशा प्रकरणांचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे. निर्भयाचे बलात्कारी अजूनही फासावर चढलेले नाहीत. तारखांवर तारखा येत आहेत. एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होणे हे समाजाला चिंतीत करणारे आहे. या आरोपींना तात्काळ शासन व्हावं असं नागरिक म्हणून फार मनापासून वाटतं. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -