घरमनोरंजनMaharashtra Flood : अभिनेत्री दिपाली सय्यदने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात; १० कोटींची...

Maharashtra Flood : अभिनेत्री दिपाली सय्यदने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात; १० कोटींची केली मदत

Subscribe

गेल्या ४ ते ५ दिवसात झालेल्या तुफान पावसाने महाराष्ट्रातील कोकण भागासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपले. या पूरजन्य परिस्थितीनंतर दोन दिवसांनी पूराचे पाणी ओसरताना दिसत आहे. अशातच राजकीय नेत्यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. यासह काही भागात निधी दिला तर काही आश्वासनं देखील दिलेत. अनेक भागात नेते, अभिनेते दौरे करत असून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी १० कोटींची मदत जाहीर केली.

कोकणातील महाड, चिपळून, रायगड सारख्या भागात पुराने अक्षरशः कहर केला आणि कित्येक लोकांचे जीव गेले. तर दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले. पूर ओसरल्यानंतर या भागात नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या भागातील पीडितांना नुसते आश्वासनं देण्यात येत आहे. राज्य सरकारने तातडीची मदत म्हणून व्यापाऱ्यांना १० हजार व सामान खरेदीसाठी ५ हजार अशी १५ हजारांची मदत जाहीर केली आहे. मात्र, अद्याप कुठलंही पॅकेज जाहीर करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन या गावाला भेट दिली. येथील वास्तव पाहून त्यांचंही मन हेलावले. त्याच, संवेदनशील भावनेतून त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल १० कोटींची मदत जाहीर केली आहे. यावेळी, त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली.

- Advertisement -

यावेळी दीपाली सय्यद म्हणाल्या, भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार?”, असे म्हणत त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्यात


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -