घरCORONA UPDATEमहिलेने आपल्या मुलाचे नाव 'सोनू सूद' ठेवले, हे कळताच सोनू सूद म्हणाला....

महिलेने आपल्या मुलाचे नाव ‘सोनू सूद’ ठेवले, हे कळताच सोनू सूद म्हणाला….

Subscribe

आतापर्यंत सोनू सूदने हजारो प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे.

कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊनचा ४ था टप्पा देशात सुरू आहे. परंतु या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. बॉलिवूडच्या या अभिनेत्याकडे लोकं ट्विटरच्या माध्यमातून मदत मागत आहेत आणि तो त्याला प्रतिसाद देत आहे. आतापर्यंत सोनू सूदने हजारो प्रवासी मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. सोनू सूदच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनू ने घरी पाठवलेल्या काही ग्रुपमधील एका महिलेने मुलाला जन्म दिला. तीने आपल्या मुलाचं नाव सोनू सुद ठेवलं आहे.

- Advertisement -

या विषयी बोलताना सोनू सूद म्हणाला की, त्याने १२ मेला दरभंगा येथे एक गट पाठविला. या गटातील दोन महिला गर्भवती होत्या. हा गट घरी पोहोचला आणि त्या महिलेला बाळ झाले. कुटुंबीयांनी मला फोन करून आपल्या मुलाचे नाव सोनू सूद असे ठेवल्याचे सांगितले. सोनूने त्याला विचारले की सोनू सूद कसे काय, सोनू श्रीवास्तव असे हवे?  बाई म्हणाली, “नाही, आम्ही मुलाचे नाव सोनू सूद श्रीवास्तव ठेवले आहे.” सोनू म्हणतो की ही गोष्ट माझ्या मनाला स्पर्शून गेली.

- Advertisement -

सोनूसाठी बुधवारचा दिवस खास होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना बोलावून त्यांचे कौतुक केले. त्यांच्यासाठी हा सन्मान असल्याचे सोनू सूद म्हणाला, त्याने माझ्या कामाचे कौतुक केले.

तो पुढे म्हणाला,  लोक सतत फोन करत असतात, बर्‍याच लोकांना पाठवत असतात. मला संपूर्ण भारतातून दररोज सुमारे ५६ हजार मेसेज येतात. हे एक आव्हान आहे परंतु मदत करणे देखील गरजेचे आहे.


हे ही वाचा – कोरोनाचा काही तासात मिळणार रिपोर्ट, चाचणीही होणार केवळ २०० रूपयात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -