बॉक्सिंगचा ‘बादशाह’ माइक टायसन ‘लाइगर’ मधून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

mike tyson to make a cameo in karan johar film liger
बॉक्सिंगचा 'बादशाह' माइक टायसन 'लाइगर' मधून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

जगातील सर्वात प्रसिद्ध खतरनाक बॉक्सिंग प्लेअर माइक टायसन बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. माइक करण जोहरच्या ‘लाइगर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरने स्वत: सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे. करण जोहरने टायसनला इंट्रोड्यूस करवून देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात करणने लिहिले की, भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच बॉक्सिंगच्या रिंगणातील किंग सिनेमात झळकणार आहे. माइक टायसनचे लाइगर टीममध्ये स्वागत आहे.

लाइगर हा बॉक्सिंग या खेळावर आधारित सिनेमा आहे. यात विजय देवरकोंडासह अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय राम्या कृष्णन, चार्मी, रॉनित रॉय बोस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. लाइगर सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करणार आहेत.

टायसनची कारकीर्द

माइक टायसन १९८५ ते २००५ पर्यंत बॉक्सिंगचा बादशहा म्हणून ओखळला जात होता. यावेळी त्याला आयरन माइक आणि किड डायनामाइट सारख्या पदव्या देण्यात आल्या. यानंतर त्यांना ‘द बेस्ट मॅन ऑन द प्लॅनेट’ हा पुरस्कार देण्यात आला. टायसनने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत १९ प्रोफेशनल फाइट्स नॉटआऊट होत जिंकल्या. तर यातील १२ लढतीत प्रतिस्पर्धांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना कराव लागला. १९८७ ते १९९० पर्यंत टायसन हे बिनविरोध हँवीवेट चॅम्पियन राहिले. त्यामुळे बॉलीवूडमध्ये टायसन यांना बॉक्सिंग करताना दिसणार आहे.