घरमनोरंजनगावागावातही मोठ्या पडद्यावर लवकरच 'झिंगाट'!

गावागावातही मोठ्या पडद्यावर लवकरच ‘झिंगाट’!

Subscribe

देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि गावागावांत लोकांना सिनेमा पाहता यावा, यासाठी अभिनेता सतीश कौशिक यांनी मोबाईल डिजीटल मुव्ही थिएटर अर्थात मेक शिफ्ट थिएटरची संकल्पना आणली आहे. नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे.

बॉलीवूडमधील चित्रपट अथवा त्यातील प्रसिद्ध पात्रांची नावं या संकल्पनेसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रक्सना देण्यात येणार असून, काही महिन्यांतच दहा थिएटर युनिट्स गावागावांमध्ये पोचतील. मिस्टर इंडिया, बाहुबली, शहेनशाह, डॉन अशी नावं या ट्रक्सना देण्यात येतील. हे युनिट्स ट्रकमध्ये असणार असून, या प्रत्येक ट्रकमध्ये डॉल्बी डिजीटलसह २२ इंची स्क्रीन देण्यात येईल. हा संपूर्ण ट्रक वातानुकूलित असून, यामध्ये २०० लोकांना एका वेळी सिनेमा पाहता येणार असल्याचे सतीश कौशिक यांनी सांगितले.

- Advertisement -

परवडण्याजोगा सिनेमा आम्हाला सर्वांपर्यंत पोहचवायचा असल्यामुळे या ट्रक्समध्ये एकाच श्रेणीची तिकिट्स असतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. साधरणतः 35 ते 75 रुपये इतकी तिकिटांची किंमत असणार आहे. ही तिकिट्स मिळविण्यासाठी एडीएमडी अॅप येणार असून बुकमाय शोशी वाटाघाटी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रयत्नामध्ये शासनानेदेखील मदत करण्याचे ठरवले आहे. मात्र कोणत्याही स्वरुपाची आर्थिक मदत शासन करीत नसून, केवळ युनिट्सचे ट्रक उभे करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या त्यांच्याकडून देण्यात येत आहेत, असे सतीश कौशिक यांनी सांगितले. अजूनही जागा मात्र निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. हा एक वेगळा प्रयोग असून, देशातील गावागावांमध्ये सिनेमा पोचण्यासाठी उचललेले हे वेगळे पाऊल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -