घरताज्या घडामोडीMouni Roy Wedding : स्वत:च्याच लग्नात घाबरुन रडली मौनी रॉय ; 'हे'...

Mouni Roy Wedding : स्वत:च्याच लग्नात घाबरुन रडली मौनी रॉय ; ‘हे’ होतं कारण

Subscribe

नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबरिया यांच्या रिलेशनशिपची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर सुरु होत्या. अखेर हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काल दोघांनीही दाक्षिणात्या पद्धतीने लग्न केले. त्यानंतर या दोघांनी बंगाली परंपरेनुसार, विवाहसोहळा पार पाडला. मौनी आणि सूरजचे लग्नाचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेत आहेत. मौनीच्या लग्नामध्ये तिच्या परिवारासोबत सिनेमासृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थितिती दाखवली. या अभिनेत्रीच्या लग्नात मीत ब्रदर्सच्या मनमीत सिंहने देखील हजेरी लावली असून, तिच्या लग्नात मोठ्या भावाप्रमाणे सर्व विधी पार पाडल्या. बंगाली परंपरेनुसार लग्न करतानाचा मौनी रॉयने केलं असं काही की, हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y C O O K (@filmycook)

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओमधील या परंपरेला ‘शुभो दृष्टि सेरेमनी’ असे म्हटले जाते. यावेळी मौनीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यावेळी तिला पाटावर बसवून लग्नमंडपात आणले जाते. या रिवाजावेळी नवऱ्यामुलीला चार भावांनी बाजूने पकडण्याची परंपरा आहे. याशिवाय यावेळी नवरीचा चेहरा तिला पानाने झाकावा लागतो. या व्हडिओमध्ये हे पाहायला मिळत आहे की, मौनी त्या पानांमधून लपूनछपून सूरज नांबरियाचा चेहरा पाहत आहे, त्याचवेळी अचानक ती घाबरते. खरतरं या रिवाजावेळी चार भावांना नवऱ्यामुलीला घेऊन ७ फेऱ्या माराव्या लागतात. यावेळी मौनी हातात पान घेऊन आहे मात्र, त्याचवेळी ती खूप घाबरलेली असून, अचानकपणे ओरडायला सुरुवात करते. घाबरलेली मौनी म्हणाली की, ७ फेऱ्या नको एकच फेरी पुरेशी आहे. कारण तिला असे वाटत होते की, ती कोणत्याही क्षणी या पाटावरुन खाली पडेल, मात्र चार भावांनी तिला आणि पाटाला व्यवस्थितरित्या पकडली आहे.

कोरोनाच्या सावटामुळे या लग्नाला जास्त लोकांनी बोलवण्यात आले होते. मात्र लग्नाशी निगडित सर्व रितीरिवाज निभवण्यात आले आहेत. मौनी आणि सूरज यांची पहिली ओळख 2019मध्ये झाली होती. दोघेही तेव्हा दुबईमध्ये भेटले होते. तिथेच ते एकमेकांना आवडू लागले. दोघांनी 4 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षात दोघांनी त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. मात्र आता ऑफिशिअली दोघांनी त्यांच्या नात्याची नवरा बायको म्हणून घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

- Advertisement -


हे ही वाचा – Mouni Roy Wedding First Photo: अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात, दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला सोहळा


 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -