घरमनोरंजनमी नकारात्मक गोष्टींवर... 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला खोटं म्हणणाऱ्या कंगनाला मौनी रॉयने...

मी नकारात्मक गोष्टींवर… ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला खोटं म्हणणाऱ्या कंगनाला मौनी रॉयने दिलं उत्तर

Subscribe

मौनीने 'ब्रह्मास्त्र'मध्ये जूनन ही भूमिका साकारली आहे. मौनीचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना पसंत पडला आहे. 'ब्रह्मास्त्र'ने आत्तापर्यंत एकूण 360 कोटींची कमाई केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या ब्रह्मास्त्र चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं असून या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, नागार्जुन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने जवळपास 360 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाचं अनेकजण कौतुक करत आहेत. शिवाय मौनी रॉयच्या अभिनयाचं देखील कौतुक करत आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये मौनी रॉयला एका स्पॉटबॉय कडून प्रश्न विचारण्यात आला की, “कंगना रनौत ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला खोट असल्याचं म्हणत आहे. या वर तुमचं काय उत्तर आहे?”

या प्रश्नावर मौनी रॉय सडेतोड उत्तर देत म्हणाली की, आम्ही नकारात्मक गोष्टींवर बोलत नाही.” तसेच त्यानंतर मौनीने कंगना बद्दल विचारलेल्या प्रश्नावर फार काही उत्तर दिलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

- Advertisement -

दरम्यान, मौनीने ‘ब्रह्मास्त्र’मध्ये जूनन ही भूमिका साकारली आहे. मौनीचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना पसंत पडला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने आत्तापर्यंत एकूण 360 कोटींची कमाई केली आहे.

2022 मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट
2022 मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’ ज्याने 190 कोटींची कमाई केली होती.

- Advertisement -

‘दंगल’ आणि ‘पद्मावत’ला देखील टाकलं मागे
‘ब्रह्मास्त्र’ने बॉलिवूडमधील मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा संजू, टायगर जिंदा है , पद्मावत, धूम 3 , दंगल आणि चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.ॉ


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रच्या कमाईचा जोर ओसरला; 12 व्या दिवशी सर्वात कमी कमाई

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -