घरमनोरंजननागराज मंजुळेंच्या 'तार' शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज

नागराज मंजुळेंच्या ‘तार’ शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज

Subscribe

रितेश देशमुख याच्या मुंबई फिल्म्स या बॅनरखाली ही शॉर्टफिल्म तयार होत आहे. 

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रितेश देशमुख निर्मित ‘तार’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरुवातीला नागराज आणि रितेशच्या चाहत्यांना असं वाटलं की रितेश पुन्हा एकदा मराठीत नवा सिनेमा घेऊन येतो की काय. रितेशचे चाहते त्याची वाट पाहत होते. पण या जोडीने शॉर्ट फिल्म या आजच्या लोकप्रिय माध्यमातून तार नावाची कथा मांडायचं ठरवलं. या शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज झाला असून त्यामध्ये नागराज पोस्टमनच्या खाकी लुकमध्ये दिसत आहे.

खाकी शर्ट, खाकी पॅंट, टोपी खांद्यावर अडकलेली खाकी पिशवी, आणि त्यात पत्रांचा गठ्ठा. त्यावरचा पत्ता वाचून घराघरापर्यंत पत्र पोहोचवणारा पोस्टमन आपल्या प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर नेहमी उभा राहतो. असा पोस्टमन बनून नागराज मंजुळे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पोस्टमन पोस्टमनचा आयुष्याची कथा सांगणार आहे.

- Advertisement -

रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. रितेशच्या या निर्मिती संस्थेखाली काही मराठी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच निर्मिती संस्थेचा पोस्टमनची गाथा सांगणारा ‘तार’ हा पहिला लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या लघुपटात नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेला पोस्टाचा डबा, बंद पडलेली तार सेवासह पोस्टमन काकांची कथा या लघुपटात पाहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे ‘नाळ’ चित्रपटानंतर ‘तार’ या लघुपटात झळकणार आहे. ‘तार’ या लघुपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक पंकज सोनावणे यांनी केले आहे.

- Advertisement -

फॅन्ड्री, पिस्तुल्या या सिनेमातून नेहमीच वेगळे कथानक मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराटने कोट्यवधींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवला. या सिनेमातही त्याची छोटीशी भूमिका होती. रितेश देशमुख याच्या मुंबई फिल्म्स या बॅनरखाली ही शॉर्टफिल्म तयार होत आहे.


इंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली मराठमोळी मिथिला पालकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -