घरमनोरंजनकलर्स मराठीवरील 'या' मालिकांमध्ये रंजक वळण

कलर्स मराठीवरील ‘या’ मालिकांमध्ये रंजक वळण

Subscribe

कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये सध्या रंजक वळण घेतलं आहे. घाडगे अॅण्ड सून आणि सुखांच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कलर्स मराठीवरील ‘घाडगे & सून’ आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन्ही मालिकेने सध्या वेगळ वळण घेतलं आहे. एकीकडे अक्षय अमृताकडे पुन्हा ओढला जातोय तर दुसरीकडे अनुला मिळवण्यसाठी सिद्धार्थची धडपड सुरू आहे.

घाडगे & सून

- Advertisement -

कलर्स मराठीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेने एक वेगळ वळण घेतलं आहे. कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला समजलं आहे. कुठेतरी अक्षयला कियारासाठी अमृताला सोडल्याचे दु:ख जाणवू लागले आहे. परंतु हे तो अमृताला सांगू शकत नाहीये. कियाराने आपल्याशी इतक मोठ खोट बोलल्याचे अक्षयला सहन होत नाहीये. हे सगळे घडत असतानाच अमृता आणि अक्षयची मैत्रीण त्यांना त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावते तेंव्हा अनाहूतपणे अक्षय आणि अमृता एकमेकांच्या जवळ येतात. अमृता या परिस्थितीला कसे सांभाळून घेईल ?  या घटनेने दोघांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची भावना येणार का ? अक्षय आणि अमृता यांच्या नात्याचा बंध अजून दृढ होणार का ? अक्षय अमृताला कियाराचे सत्य सांगणार का ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा घाडगे & सूनचे पुढचे काही भाग अजिबात चुकवू नका.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’

- Advertisement -

तर ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेमध्ये एकीकडे सिद्धार्थला कुठेतरी अनुचा सहवास, तिच्यासोबत गप्पा मारणे हे आवडू लागले आहे म्हणजेच ही प्रेमाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. सिध्दार्थने अनुचा विश्वास आणि मैत्री पुन्हा मिळवली आहे. काही दिवसांपासून सिद्धार्थची तब्येत ठीक नसल्याने तो घरीच आहे. सिद्धार्थच्या आजीने अनुला तत्ववादिंच्या घरी बोलावले आहे. अनु घरी येणार म्हणून सिद्धार्थने त्याची रूम नव्याने सजवली आहे. आता हे दुर्गाला समजल्यावर ती काय पाऊल उचलणार हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे. तर सिद्धार्थ अजून अनुच्या जवळ जाईल आणि तुझ्यापासून दूर होत जाईल. हे सगळे प्रकरण सिद्धार्थला कळेल ? अनु आणि सिद्धार्थच्या मैत्रीमध्ये दुर्गा पुन्हा दुरावा आणू शकेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका बघितल्यावरच मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -