घरदेश-विदेशमतदानासाठी लावण्यात येणाऱ्या शाईचा प्रवास...

मतदानासाठी लावण्यात येणाऱ्या शाईचा प्रवास…

Subscribe

१९६२ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शाईचा वापर केला गेला. त्यानंतर देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शाईचा वापर केला जाऊ लागला.

सर्वप्रथम १९६२ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शाईचा वापर केला गेला. त्यानंतर देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शाईचा वापर केला जाऊ लागला. त्याकाळात हे एक क्रांतिकारक पाऊल होते असे म्हटले जाते.

निवडणूकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदाराच्या बोटावर शाईची खूण का लावली जाते ? काय आहे या शाईचे कहानी ? कसा आहे, या मतदानासाठी लावण्यात येणाऱ्या शाईचा प्रवास जाणून घेऊया….
  • कागदावर लिहिण्यासाठी शाईचा वापर केला जातो. मात्र निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी शाई ही वेगळ्या प्रकारची असते.
  • मतदानाच्या वेळी लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे एकत्रित मिश्रण असते. त्यामुळेच ती शाई जेव्हा बोटावर लावली जाते. तेव्हा त्वचेवर असलेल्या सॉल्टसोबत प्रक्रिया होऊन ती गडद होते.
  • निवडणूकीच्या काळात फसवणूक, बहुमतदान, बोगस मतदान आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी मतदारांच्या बोटावर शाईने खूण केली जाते.
  • ही शाई बोटावर लावताच त्या शाईचा ओलसरपणा १० ते १५ सेकंदात नष्ट होतो. त्यामुळे ही सर्वसाधारण शाई नसते, कितीही प्रयत्न केला तरी ही शाई लवकर निघत नाही. शाईची निशाणी १५ दिवसांत पुसट होते. पण ती पूर्णपणे निघून जाण्यास तीन महिने लागतात.
  • मतदान केंद्रावर लावण्यात येणारी शाई भारतात कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील म्हैसूर पेंटसड् वर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) यांना या शाईचे श्रेय जाते.
  • भारतात ही शाई एकाच ठिकाणी तयार केली जाते. Mysore Paints & Varnish Ltd (MVPL) या कंपनीत तयार होणारी शाई भारतीय निवडणूक आयोगाशिवाय इतर देशांकडूनही खरेदी केली जाते. यामध्ये कॅनडा, कंबोडिया, मालदीव, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की यासारख्या देशांचा समावेश आहे. मात्र, सहजा-सहजी कोणत्याही बाजारात ही शाई विकत मिळत नाही.
  • भारताबरोबरच विविध देशांना एमपीव्हीएलकडून मतदानाच्या शाईचा पुरवठा केला जातो. गुणवत्तापूर्ण पक्क्या शाईचे उत्पादन आणि पुरवठा करण्यामध्ये एमपीव्हीएलची विशेषता आहे.
  • सुरुवातीच्या काही निवडणुकांमध्ये शाई नाही तर डायचा वापर करण्यात आला होता. नंतर कायमस्वरूपी शाईचा शोध लागला. या शाईची संकल्पना पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.
  • निवडणुकीची ही खास शाई जगातील विविध देशांमध्ये वापरली जाते. भारताप्रमाणे जवळपास सर्वच देशांत ही जांभळ्या रंगाची शाई वापरली जाते. सुरीनाममध्ये एकदाच नारंगी रंग असणाऱ्या शाईचा वापर करण्यात आला होता. परंतु, त्यानंतर कधीच नारंगी रंगाच्या शाईचा वापर करण्यात आला नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -