घरमनोरंजन‘नाइटक्रॉलर’ : बदलत्या माध्यम जगताचे चित्र

‘नाइटक्रॉलर’ : बदलत्या माध्यम जगताचे चित्र

Subscribe

लु ब्लूम (जेक इलनहाल) हा बेरोजगार तरूण आहे. सुरूवातीला आपल्याला तो फक्त चोर भासतो. म्हणजे अगदी सुरूवातीच्याच दृश्यात तो चोरी करताना दिसतो. पण पकडला गेल्यावर तो वॉचमनलाच मारून सुटतो आणि चोरीचा माल एका कॉन्ट्रॅक्टरला विकतो. पण त्याचं पात्र इतकं उथळ असेल तर त्यात काय गंमत.

2000 सालानंतर, साधारण जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर प्रत्येक क्षेत्रात वाढती महत्त्वाकांक्षी प्रवृत्ती दिसून येऊ लागली. ज्यात स्वतःची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाण्याची शक्यता दिसून येऊ लागली. अगदी शहरी, निमशहरी सर्व भागात या गोष्टींचे पडसाद समप्रमाणात दिसून येऊ लागले. पण हे प्रकरण केवळ या दशकात संपेल, अशी आशा ठेवणं जरासं चुकीचंच होतं. कारण, दरवेळी समाजात घडून आलेल्या नवीन बदलांनुसार माणूस आणखी महत्त्वाकांक्षी होत होता. त्याचा तंत्रज्ञानाचा रीच जितका वाढत होता, त्याचा भोवताल जितका समृद्ध होत होता तितकाच तोही बदलत होता यात नवल ते काय. पण याच अतिमहत्त्वाकांक्षेचे उमटणारे पडसाद मात्र नक्कीच एक समाज म्हणून अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

या परिस्थितीत अजूनही सकारात्मक बदल घडत आहेत असं नाही. उलट दरवेळी आपण तंत्रज्ञानात जितके पुढे जात आहोत, तितकाच आपल्यातील विसंवाद आणि आणि काहीतरी ऑफबीट करण्याची गरज वाढत आहे.

- Advertisement -

हे सर्व बदल या शतकाच्या अगदी सुरूवातीलाच आलेल्या ’रिक्वीम फॉर अ ड्रीम’मध्येही अधोरेखित झाले होते. पण त्यात यासोबतच ड्रग अ‍ॅडिक्शन, सेक्स अ‍ॅडिक्शन, वगैरे अनेक मुद्दे होते. तरीही त्यातील सर्वच मुद्द्यांना योग्य आणि शक्य तितक्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले होते.

मग फक्त आणि फक्त वाढती महत्त्वाकांक्षी प्रवृत्ती आणि तिचा अतिरेक आणि यामुळे होणारे परिणाम यांना वाहिलेला ‘नाइटक्रॉलर’ त्याचं सादरीकरण आणि कथेत गुंतवून ठेवण्याच्या क्षमतेच्या जोरावर फक्त या मुद्याला हात घालण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर याकडे तटस्थपणे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी देतो. इथं तो कशाचंही उदात्तीकरण करत नाही किंवा मी काहीतरी अफाट गोष्ट जगासमोर मांडतोय असा आव आणत नाही. तर यातील प्रत्येक घटना वास्तववादी मार्गाने दाखवून आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.

- Advertisement -

 कारण नंतर तो थेट त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे काम मिळवण्यासाठी चांगलं लंबंचौडं भाषण देतो. यातूनच तो त्याची बाजू, त्याचे गुण, काहीही करण्याचा त्याचा स्वभाव आणि महत्त्वाकांक्षा त्या व्यक्तीसमोर आणि अर्थातच आपल्यासमोर मांडतो. अर्थातच त्याला नोकरी मिळत नाही. मात्र त्याच्या डोळ्यातील ती चमक, त्याच्या स्वभावाची झलक आपल्याला त्या एकाच दृश्यातून प्रभावीपणे कळते.

पुढे हायवेवर एक अ‍ॅक्सिडेंट झालेला असतो. हा गाडीतून खाली उतरून सर्व काही पाहत असतो. तर त्याच वेळी तिथे जो लोडर (बिल पॅक्स्टन) हा स्ट्रिंगर येतो आणि त्या सर्व घटनेचा व्हिडिओ शूट करतो. यातही लु ला काहीतरी करण्याची संधी दिसते आणि तो जो कडे काम मागतो. पण इथेही त्याला नकारच मिळतो. पण यामुळे तो अजूनच पेटून उठतो आणि जणू जे करायचं ते यातच करायचं असा निर्धार करतो. पण रेकॉर्डिंग करायला आणि स्ट्रिंगर बनायला आवश्यक असलेलं काहीच त्याच्याकडे नसतं. मग पुन्हा इथेही एक सायकल चोरी करून, ती विकून त्याऐवजी कॅमेरा आणि पोलीस ट्रॅकर मिळवतो आणि कामाची सुरूवात करतो.

त्या रात्री भलेही त्याच्याकडून चुका होतात पण त्यातूनच त्याचा फायदा होतो. त्या रात्री बनवलेला व्हिडिओ तो एका न्यूज चॅनेलला विकतो. त्या चॅनेलची न्यूज डायरेक्टर निना रोमिना (रेनी रसो) हिला रेटिंग्ज वाढवण्यासाठी खास करून हिंसा असलेल्या फुटेज हव्या असतात. मग आपल्या कामाचा विस्तार म्हणून लु हा रिक (रिझ अहमद) या कमीत कमी पैशात काहीही करायला तयार असणार्‍या मुलाला इंटर्न म्हणून काम देतो.

पुढे तो या क्षेत्रातील सर्व परिस्थिती पाहून, स्वतःमध्ये आणि कामाच्या स्वरूपात बदल करतो. पण हे करत असताना त्याची हीच महत्त्वाकांक्षा त्याला यश मिळवण्यासाठी काहीही करण्यास भाग पाडते. यासाठी थेट निनालाच धमकावणे ते कित्येक खून करणे या सर्व गोष्टी येतातआणि इथेच हा चित्रपट फक्त वास्तववाद दाखवण्याऐवजी जगातील कित्येक लोकांचीच अवस्था दाखवण्यात यशस्वी होतो. पण इथे केवळ अतिमहत्त्वाकांक्षा हा मुद्दा येतो असं नाही.

लु हा तसं पाहिलं तर आपल्यातील मास चं प्रतिनिधित्व करतो. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, चिकाटी असूनही योग्य ती संधी न मिळाल्याने प्रवाहातून बाजूला पडून गुन्हेगारी मार्गाकडे वळण्यापासून तो सावरतो. पण पुन्हा तो त्याचं काम करत असताना काहीही करून यशस्वी होण्याच्या त्याच्या मूळ स्वभावाला वेसण घालू शकत नाही. फरक इतकाच की स्वतःला विकता येण्याची जी कला बहुतांशी लोकांकडे नसते ती त्याच्याकडे आहे. तो स्वतःची मतं केवळ दुसर्‍यासमोर मांडतच नाही, तर कित्येकदा ती मतं पूर्वतयारीने त्यांच्या मनात इम्प्लिमेंट करतो.

निनादेखील थोड्याफार फरकाने तशीच आहे. लु आणि निनाच्या सुरूवातीच्या एक दोन भेटींतच आपल्याला तिची काम करण्याची पद्धत समजते. ती मागणी तसा पुरवठा या साध्या तत्त्वानुसार काम करते. तिचं कुठल्याही बातमीविषयी अथवा कशाविषयीच काहीही इतिकर्तव्य नाही. तिला फक्त ती बातमी जास्तीत जास्त मनोरंजक करून, त्यात शक्य तितका मसाला टाकून लोकांचं त्याकडे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीने मांडण्यात रस आहे. ती आजच्या आपल्या समाजातील जवळपास सर्वच माध्यमांचं प्रतिनिधित्व करते. ती केडब्ल्यूपीडी चॅनेलची मॉर्निंग न्यूज एडिटर आणि डायरेक्टर आहे. पण सकाळी तिचे प्रेक्षक नाश्ता करत असतानाही त्यांना हिंसा, खुनाच्या बातम्या दाखवण्यात तिला काहीच गैर वाटत नाही. कारण यावेळी पाहिलेली बातमी दिवसभर त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि ओघानेच प्रेक्षकही कुठेतरी सुप्तपणे अशा बातम्यांकडे आकर्षिले जात असल्याने ते अशा बातम्यांकरिता पुन्हा तिच्याच चॅनेलवर परतणार आहेत. म्हणजे फिरून पुन्हा तिचाच फायदा होणार आहे.

– अक्षय शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -