घरमनोरंजनHbd Kriti Sanon- सुशांत सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कृतिने केलं होतं कबुल

Hbd Kriti Sanon- सुशांत सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कृतिने केलं होतं कबुल

Subscribe

'हिरोपंती' सिनेमा पुर्वीच कृतिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत हे फार  कमी जणांना ठाऊक आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेननसाठी ( Kriti Sanon)आजचा दिवस खास आहे. आज कृती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. कृतिने ‘हिरोपंती’ या सिनेमातून आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरुवात केली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहीले नाही. अनेक हिट अभिनेत्रींच्या यादित कृतिची गणना केली जाते. आज तिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहेत. ‘हिरोपंती’ सिनेमा पुर्वीच कृतिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत हे फार  कमी जणांना ठाऊक आहे. कृति पहिल्यांदा दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सोबत झळकली होता. तसेच चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडली होती. यानंतर कृतिने बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफ सोबत डेब्यू केलं. तसेच कृति अभिनेता सलमान खानची खुप मोठी चाहती असल्याचे तिने अनेक इंटरव्यूमध्ये म्हंटलं आहे. इतकचं नाही तर कृतिने बॉलिवूड बादशाह शाहरूख खान सोबत देखील काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

चित्रपटात येण्यापुर्वी कृतिने टेलिव्हिजनच्या जाहिरातीमध्ये काम केलं होत. बॉलिवूडमध्ये एंन्ट्री केल्यानंतर कृतिने तिच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर फिल्मफेअर अवॉर्डवर बाजी मारली तसेच कृतिने अनेक चित्रपटात काम केलं. 2017 साली आलेला ‘राब्ता’ या सिनेमानंतर कृतिच्या व्यक्तीगत आयुष्यात देखील काही रंजक गोष्टी घडत होत्या. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच कृतिने अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

अभिनेत्री कृति सेनन आता लवकरच ‘आदिपुरुष’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता प्रभाससोबत कृति दिसणार आहे. तसेच सरोगेट महिलेच्या आयुष्यावर आधारीत ‘मीमी’ या सिनेमात कृति पहिल्यांदाच महिला प्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)


हे हि वाचा – अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांना आला ब्रेन स्ट्रोकचा झटका,दीपिका कक्कडने दिली माहिती

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -