घरमनोरंजन'पानिपत' चित्रपट विरोधात कोर्टात याचिका दाखल

‘पानिपत’ चित्रपट विरोधात कोर्टात याचिका दाखल

Subscribe

‘पानिपत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटात मराठ्यांचा चुकीचा इतिहास दाखविला गेल्याचा आरोप सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील व्यक्तींनी केला आहे. हा चित्रपट मराठा सरदारांच्या वंशजांना दाखवूनच प्रदर्शित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात उत्तमराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.


हेही वाचा – राज ठाकरे यांनी केले ‘पानिपत’ चित्रपटाचे कौतुक

- Advertisement -

 

मराठा सरदारांच्या वंशजांची ‘ही’ आहे मागणी

पत्रकार परिषदेत मस्तानी यांचे आठवे वंशज नवाब शादाब अली बहादुर यांनी भोपाळ येथून या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया मोबाईलद्वारे ऐकवली. त्यांनी देखील हा चित्रपट पानिपत मधील सर्व मराठा सरदारांच्या वंशजांना दाखवूनच प्रदर्शित करावा, या युद्धातील कोणत्याही मराठा सरदारांच्या कामगिरी संदर्भात चुकीची माहिती या चित्रपटातून दाखविली जाऊ नये, अशी मागणी केली. मस्तानी यांचे पुत्र समशेर बहादूर यांच्याविषयी चुकीची माहिती दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेत ऍड. अश्विन मिसाळ, ऍड. वाजीत बिडकर आदी उपस्थित होते. पानिपत युद्धात सरदार महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे ,इब्राहिम खान गारदी आधी ४८ हून अधिक सरदार घराण्यांनी पराक्रम गाजविला होता. त्या सर्व ऐतिहासिक व्यक्तिरेखांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -