घरताज्या घडामोडीरात्री माझा व्हिडिओ बघतात, अन् सकाळी ट्रोल करतात, पूनम पांडेला सोडायचाय भारत

रात्री माझा व्हिडिओ बघतात, अन् सकाळी ट्रोल करतात, पूनम पांडेला सोडायचाय भारत

Subscribe

लोक माझे व्हिडिओ रात्री बघतात आणि सकाळी मला ट्रोल करतात.

अश्लील व्हिडीओ आणि फोटोंमुळे पुनम पांडे नेहमी चर्चेत असते. सध्या ती कंगना रनौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. पूनम पांडेचा हा पहिलाचं रियालिटी शो आहे, ज्यात ती तिच्या खाजगाी आयुष्याबाबत अनेक खुलासे करत आहे. पूनम पांडे सोशल मिडियावरील वादग्रस्त असा सेलिब्रिटी चेहरा आहे. जिथे तिला कधी तिच्या पतीच्या मारहाणीने तर कधी तिच्या अश्लील व्हिडिओ आणि फोटोंमुळे खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं.

पुनम पांडेने लॉकअप या रियालिटी शोद्वारे त्या सगळ्या ट्रोलर्सला चांगलंचं उत्तर दिलं आहे. जे नेहमी तिला तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे ट्रोल करतात. या ट्रोलिंगद्वारे लोक तिला शिवीगाळ करतात. या सगळ्या गोष्टींचं उत्तर पुनमने लॉकअप या शो मधून इतर स्पर्धकांशी बोलताना दिले आहे.

- Advertisement -

पुनम पांडे लॉकअप शो मधील स्पर्धक अंजली अरोरा आणि तहसीन पूनावाला सोबत तिच्या खाजगी आयुष्याबाबत बोलताना दिसली. व्हिडिओवर ट्रोल झाल्यानंतर पुनम पांडे म्हणाली की, लोक माझे व्हिडिओ रात्री बघतात आणि सकाळी मला ट्रोल करतात. यानंतर ती देश सोडण्याबाबत ही बोलत होती.

मी माझं शरीर दाखवते- पूनम पांडे

पुनम पांडे म्हणते की, मी माझं शरीर दाखवते, कपडे काढते. या कारणामुळे तुम्ही जर मला बेशरम किंवा शेमलेस बोलत असाल तर मी तुमच्याशी सहमत नाही. माझं मत आहे की, जे लोक दुसऱ्यांना शेमलेस बोलतात, ते स्वतः सुद्धा शेमलेस असतात. पुनमचं हे बोलणं ऐकल्यानंतर तहसीन पूनावाला म्हणाली, जे लोक पुनमचा व्हिडिओ ही डाउनलोड करतात आणि तिच्या बद्दल वाईट ही बोलतात ते स्वतः चुकीचे आहेत.

- Advertisement -

रात्री माझे व्हिडिओ बघतात

पुनम पांडे म्हणाली की, लोक रात्री माझे व्हिडीओ बघतात आणि सकाळी उठताचं मला ट्रोल करायला सुरुवात करतात. मला नक्की जाणून घ्यायचंय की, बेशर्म नक्की कोण आहे? ते का मी, रात्री व्हिडिओ पाहिल्यानंतर सकाळी या लोकांना लाज वाटते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -