घरमनोरंजनस्टारकिड्सची लोकप्रियता

स्टारकिड्सची लोकप्रियता

Subscribe

सारा ही सैफ अलीची पहिली पत्नी अमृता सिंग हिची कन्या, तर करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा चिरंजीव तैमूर यांच्या लोकप्रियतेविषयी ‘स्कोअर ट्रेण्ड्स इंडिया’ ने सर्व्हे केला तर त्यात करिना आणि सैफ यांच्यापेक्षा त्यांच्या मुलांचीच लोकप्रियता अधिक असल्याचे लक्षात आले आहे. तैमूर हा जन्माला आल्यापासूनच चर्चेत आहे तर साराला ‘सिम्बा’ चित्रपटामुळे अलीकडे लोकप्रियता लाभलेली आहे. आता ज्या स्पर्धेतल्या नायिका आहेत, त्यात तिची गणना केली जात आहे. आईवडिलांपेक्षा मुलच वरचढ असेच म्हणावे लागेल.

डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज अशा तीन गटांत लोकप्रियतेची विभागणी केलेली आहे. यात सर्वांधिक गुण साराच्या वाट्याला आलेले आहेत. तैमूर हा स्टारकिड्स असल्यामुळे त्याला पहाण्यासाठी बंगल्याबाहेर अनेक चाहते घुटमळत असतात. एक फोटो इंटरनेटवर टाकल्याने लाखो लोक लाईक करत असल्याचे ‘स्कोअर ट्रेण्ड्स इंडिया’च्या लक्षात आले असल्याचे सहसंस्थापक अश्विनी कौल यांनी घोषित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -