घरमुंबईवसईत विकृत तरुणाची भीती

वसईत विकृत तरुणाची भीती

Subscribe

काही महिन्यांपुर्वी तीन जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून सर्वांना हादरवून सोडणार्‍या सिरीयल किलरला अटक केल्यानंतर आता तसाच एक विकृत तरुण वसईमध्ये फिरत असल्याच्या शक्यतेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेहान कुरेशी नावाच्या तरुणाने नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात आपल्या विकृतीने सर्वांना हादरवून सोडले होते. या जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना भुलथापा देवून कुरेशी अर्धवट काम झालेल्या इमारतीत नेऊन अत्याचार करत असल्याचे उघड झाले होते. त्याला जेरबंद करण्यात पोलीसांना यश आल्यानंतर काही महिने वसईकर पालकांनी सुटकेचा निश्वास घेतला असतानाच कुरेशी सारखाच एक विकृत इसम वसईत फिरु लागल्याची चर्चा आहे. कुरेशी सारखीच निळी जीन्सपॅन्ट,पँटीत खोचलेला मॅचींग शर्ट, त्यावर चामडी पट्टा, पायात बुट आणि खांद्यावर बॅग असे या अज्ञात तरुणाचे वर्णन आहे.

- Advertisement -

वसईच्या आनंदनगरात एका 10 वर्षीय मुलीशी असाच पेहराव केलेल्या एका अज्ञात तरुणाने अश्लिल वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मुलगी गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास क्लासच्या इमारतीत शिरताना त्याने या मुलीशी गैरप्रकाराचा प्रयत्न केल्याची तक्रार सदर मुलीने माणिकपुर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीसीटिव्ही फुटेज पाहून त्याचा शोधही घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -