घरमनोरंजनPriya Bapat : लग्नाच्या 13 वर्षांनंतरही मुलं नाही!, प्रिया बापट म्हणते...

Priya Bapat : लग्नाच्या 13 वर्षांनंतरही मुलं नाही!, प्रिया बापट म्हणते…

Subscribe

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रिया हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता उमेश कामतसोबत (Umesh Kamat) तिने 13 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. या मराठीतील लोकप्रिय असलेल्या जोडप्याला अद्याप बाळ नाही. त्यावरून अनेकदा प्रियाला विचारणा होत असते. या प्रश्नावर प्रिया बापटने मौन सोडले आहे. एका मुलाखतीत बोलताना प्रियाने बाळाबद्दल स्पष्टच उत्तर दिले.

हॉटर फ्लायच्या मुलाखतीत प्रियाला बाळाबद्दलच विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कसा हाताळतेस असे विचारण्यात आले. त्यावर प्रियाने म्हटले की, तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? असा सवाल तिने केला. ज्या जोडप्याला मुलं नकोत आणि त्या आनंदी आहेत, तरी त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असे वाटत असल्याचे प्रियाने म्हटले.

- Advertisement -

प्रिया मुलाखतीत पुढे म्हणाली की, आमच्या कपल फोटोवर बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स असतात. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार असेही प्रियाने स्पष्ट म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 एका नाटकानंतरचा प्रसंग सांगत प्रिया म्हणाली, ‘उमेश आणि मी एकत्र नाटक करतोय त्या प्रयोगाला एक काकू आल्या. म्हणाल्या, आम्हाला गुडन्यूज पाहिजे.’मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळ कधी करणार’. मी उत्तर देईस्तोवर त्या तोच प्रश्न विचारत राहिल्या. मग मी त्यांना म्हणाले, काकू मला माझ्या आईनेही कधीच हा प्रश्न नाही विचारला, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका,’ यावर काय उत्तर द्यायचं हे मला कळत नाही.

- Advertisement -

एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत प्रेग्नन्सीबद्दल कमेंट्स आल्या, असा खुलासा प्रियाने केला. “नुकताच मी पोलका डॉट प्रिंटचा काळ्या रंगाच्या ड्रेसवरचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर ‘प्रिया बापट प्रेग्नंट आहे’, अशा कमेंट्स होत्या. अनुष्का शर्माने तिच्या प्रेग्नन्सीवेळी पोलका डॉट ड्रेस घातला होता, त्यामुळे मी घातला तर त्यांच्यामते मी प्रेग्नंट आहे,” असं म्हणत प्रिया हसू लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -