घरमनोरंजनप्रियांका चोप्रा निक जोन्ससोबत मुंबईत दाखल

प्रियांका चोप्रा निक जोन्ससोबत मुंबईत दाखल

Subscribe

क्वांटिकोच्या शुटींगनंतर प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोन्स भारतात येणार अशा अफवा ऐकायला मिळत होत्या. तिच्या चाहत्यांना याची खूप उत्सुकता होती. निकच्या मुंबई दौऱ्याच्या चर्चेला प्रियांकाने आज पूर्णविराम दिला आहे. गुरुवारी रात्री हो जोडपं मुंबईत दाखल झालं आहे. आता त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोन्स यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. या दोघांची आज पुन्हा चर्चा सुरु झाली. त्याला कारणही तसे खास आहे. प्रियांका गुरुवारी रात्री निकसोबत मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची नव्याने चर्चा सध्या सुरु झाली आहे. निक प्रियांकाची आई मधु चोप्रा यांना भेटायला आला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच येत्या काही दिवसांत हो जोडपं साखरपुडा करणार असल्याची चर्चासुद्धा सिनेवर्तुळात रंगत आहे. दोघेजण प्रियांकाच्या घरी जात असताना काही छायाचित्रकारांनी त्यांचे फोटे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु निक भारतीय मीडियाच्या नजरेस पडणार नाही याची प्रियांकाने काळजी घेतली होती. गाडीच्या मागच्या सीटवर ज्या ठिकाणी निक बसला होता, त्याच्या जवळच्या खिडकीची काच जाड काळ्या पडद्याने झाकण्यात आली होती. तरीही काही छायाचित्रकारांच्या कॅमेरापासून निक लपू शकला नाही. अमेरिकेत सर्वत्र बिनधास्त फिरणारी ही जोडी भारतात अशी का फिरेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रियांका लवकरच तिच्या जवळच्या मित्रांना एक पार्टी देणार असून या पार्टीत ती सर्वांची आणि निकची भेट करुन देणार असल्याचेही म्हटले जात आहे.

nick jonas
निक जोन्स आणि प्रियांका चोप्रा
(सौजन्य – एनडीटीव्ही)

प्रियांका काही दिवसांपूर्वी निकच्या भावाच्या लग्नात त्याच्या आई वडिलांना भेटली होती. त्यामुळे आता आपल्या आईला भेटवण्यासाठी प्रियांका निकला घेऊन मुंबईत आली आहे. प्रियांका आणि निक त्यांच्या नात्याची कबुली कधी देणार? याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली असताना प्रियांकाने चाहत्यांना काल रात्री धक्का दिला. निकच्या एक्स गर्लफ्रेंडनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत असे सांगितले होते की, ‘निक प्रियांकाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे’. त्यामुळे भारतात आलेला निक त्यांच्या प्रेमाची कबुली देतो का? हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरेल.

- Advertisement -

छायाचित्रकार व्हायरल भयानी यांनी निक व प्रियांकाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. ‘तुम्हाला आठवत असेल की मी म्हणालो होतो की, निक जोन्स भारतात येणार आहे. आणि मी जे बोललो ते खरं ठरलं आहे. निक आणि प्रियांका मुंबईत आले आहेत’, अशा आशयाचे कॅप्शन भयानी यांनी फोटोला दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -