प्रियंका चोप्राचा अमेरिकेत नवा व्यवसाय, ‘सोना होम’मधील वस्तूंच्या किमतीची सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने अमेरिकेमध्ये स्वतः चा एक नवीन व्यवसाय सुरु केला आहे आणि प्रियांकाच्या या नव्या व्यवसायाची आणि तिथल्या वस्तूंच्या किमतीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियंकाने आजवर अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच सोबत प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने अमेरिकेमध्ये स्वतः चा एक नवीन व्यवसाय सुरु केला आहे आणि प्रियांकाच्या या नव्या व्यवसायाची आणि तिथल्या वस्तूंच्या किमतीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

आणखी वाचा – ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘राजी-नामा’ चीच चर्चा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा काही न काही कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. प्रियंका चोप्राने ‘सोना होम’ या नावाने होमवेयर कलेक्शन लॉंच केले आहे. प्रियंकाने तिचे हे कलेक्शन २२ जून २०२२ रोजी लॉंच केले. मनीष गोयल हा या व्यवसायामध्ये प्रियंकाचा पार्टनर आहे. प्रियंकाने तीचा हा नवा व्यवसाय अमेरिकेमध्ये सुरु केला असून या व्यवसायामुळे प्रियंका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. न्यूयॉर्क यामध्ये प्रियंकाचे ‘सोना’ हॉटेल देखील आहे. त्याचबरोबर ‘सोना होम’ या प्रियांकाच्या कंपनीमध्ये होमवेयर वस्तू उपलब्ध आहेत. पण त्या सगळ्या वस्तूंची किंमत खूप जास्त आहे. आणि त्यामुळेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आणखी वाचा – डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली “डॉक्टर जी” ची खास भेट

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

आणखी वाचा –  ‘कन्याकुमारीला’ वैशाली सामंतचा स्वरसाज, नवा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार

‘सोना होम’ मधील वस्तूंच्या किमती

प्रियंकाच्या ‘सोना होम’ मध्ये होमवेयर कलेक्शन आहेत. ‘सोना होम’ या कंपनीच्या एका कपची किंमत ३, ४७१ रुपये एवढी आहे तर बशीची किंमत ५,३६५ एवढी आहे. टेबल क्लॉथची किंमत ३०, ६१२ रुपये एवढी आहे. तर डिनर सेटची किंमत ४,७३३ एवढी आहे. तर सर्व्हिंग बाऊलची किंमत ७,७३२ एवढी आहे. ‘सोना होम’ मधील वस्तूंच्या किमती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आणखी वाचा – मृण्मयी आणि गौतमीचा नवा फिटनेस फंडा, व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान यावर नेटकऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मला एवढं श्रीमंत व्हायचंय की मी, सोना होमचा ३० हजारांचा टेबल क्लॉथ खरेदी करू शकेन.’ अशी पोस्ट करत एका नेटकाऱ्याने ‘सोना होम’ मधील वस्तूंच्या किमतींना ट्रोल केले आहे.