विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी

मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरले जाणार आहे. यासाठी पक्षांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. भाजपाने शुक्रवारी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली.

मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारे विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) आता लवकरच भरले जाणार आहे. यासाठी पक्षांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. भाजपाने शुक्रवारी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज शिवसेनाही (Shiv sena) अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी (Rajan Salvi) यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होणार आहे. (Rajan Salvi candidature from Mahavikas Aghadi for the post of Assembly Speaker)

हेही वाचा – मी चौकशींच्या बाबतीत निडर; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला आहे.

“महाविकास आघाडीकडून अजून दोन अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

रविवारी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास काही वेळ शिल्लक असतानाच राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज मविआ नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.

दरम्यान, अर्ज भरताना सुनील प्रभू, अरविंद सावंत, अशोक चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने पत्र विधीमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांना सादर करण्यात आले आहे.


हेही वाचा – शिवसेनेला पुन्हा बसणार मोठा धक्का; आमदारांपाठोपाठ 14 खासदारही बंडाच्या पवित्र्यात