‘कन्याकुमारीला’ वैशाली सामंतचा स्वरसाज, नवा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार

लवकरच हा नवीन म्युझिक अल्बम प्रकाशित होणार आहे. त्यामुळे वैशाली सामंत हिच्या या नवीन म्युझिक अल्बमची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

ऐका दाजीबा(aika dajiba) हे गाणं प्रचंड हिट झालं या गाण्यामुळे गायिका वैशाली सामंतला(vaishali samant) सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आणि त्या नंतर वैशाली सामंत हीने एका पेक्षा एक हिट गाणी प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीच्या गायिकांपैकी एक म्हणजे वैशाली सामंत आहे. पण सध्या वैशाली सामंत हिची लगीन घाई सुरू आहे. हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना कि ही लगीन घाई नेमकी कोणाची आहे ? गायिका वैशाली सामंत हिची लगीनघाई ‘कन्याकुमारी'(kanyakumari) च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस या नव्या अल्बमसाठी गायिका वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा नवीन म्युझिक अल्बम प्रकाशित होणार आहे. त्यामुळे वैशाली सामंत हिच्या या नवीन म्युझिक अल्बमची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

 

हे ही वाचा – तुमचे नेतृत्व अनुकरणीय…मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया

 

अभिनेत्री दिशा परदेशी(disha pardeshi) आणि अभिनेता अक्षय वाघमारे(akshay waghmare) या दोन कलाकारांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ‘कन्याकुमारी'(kanyakumari) च्या विवाह सोहळ्यातील धमाल, मजा आणि मस्ती या गाण्यात दाखविण्यात आली आहे. त्याच सोबत नव वधूच्या मनातील हुरहूर आणि लग्नघरात असलेली पाहुण्याची लगबग या गाण्यातून अगदी उत्तम पणे मांडण्यात आली आहे. एकूणच लग्नाचा जो माहोल असतो तो छान मांडण्यात आला आहे. त्यामुळे हे गाणं पाहताना प्रेक्षकांना सुद्धा एक छान अनुभव मिळणार आहे. मंदार चोळकर(mandar cholkar) आहे मिताली जोशी यांनी हे गाणं शब्दबद्ध केले आहे तर हे गीत वैशाली सामंत हिच्या स्वराने एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहेत. याचबरोबर मराठी मधील सुप्रसिद्ध संगीतकार चिनार आणि महेश(chinar mahesh) यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर चित्रपट सृष्टीमधील एक नामवंत नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर(phulwa khamkar) हिने या गाण्याचे नृत्यदिगदर्शन केले आहे. तर अमोल गोळे(amol gole) यांच्या छायांकनाने हे गाणं अधिकच सजलं आहे.

 

हे ही वाचा –  सावरकरांचा अपमान करणं थांबव नाहीतर…अभिनेत्री स्वरा भास्करला धमकीचं पत्र

 

हे ही वाचा –  Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत

 

गायिका वैशाली सामंत(vaishali samant) या गाणयाबद्दल म्हणाली, की ‘मी याआधीही लग्नाची बरीच गाणी गायली आहेत पण या गणाची खासियत वेगळी आहे. एखाद्या नव्या नवरीच्या नखरेल अदा या गाण्यामध्ये खूप छान पद्धतीने आल्या आहेत. त्यामुळे हे गाणं गातानाही तेवढीच धमाल आली. हिंदी चित्रपटाला साजेसा भव्य – दिव्य पणा या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा कन्याकुमारीचे लग्न एन्जॉय करतील’ असं गायिका वैशाली सामंत हिने सांगितले

 

हे ही वाचा – तिसरी घंटा झाली… मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

 

आजपर्यंत प्रेक्षकांनी प्रत्येक चांगलया कलाकृतीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. वैशाली सामंतची अनेक गाणी सुपर हिट ठरली आहेत. त्यामुळे वैशाली सामंत हीचं नवं गाणं कसं असेल त्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. सध्या सोशल मीडियावर सुद्धा या गाण्याची चर्चा सुरु आहे.