घरमुंबईपावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? राज्यातील या 32 पर्यटनस्थळांवर बंदी

पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? राज्यातील या 32 पर्यटनस्थळांवर बंदी

Subscribe

कर्जत तालुक्यातील एकूण 18 आणि खालापूर तालुक्यातील 14 अशा एकूण 32 पर्यटनस्थळे व परिसरात आजवर घडलेल्या दुर्घटनांच्या पाहता पावसात पर्यटकांकरिता बंदी आदेश लागू करण्यात आला आहे

पावसाळ्यात (Monsoon trip) फिरायला जाण प्रत्येकाल आवडते. याचत सुट्टीच्या दिवशी आवर्जून लोक पावसाळ्यात पिकनिकचे प्लॅन बनवतात. महाराष्ट्रातही अशी अनेक ठिकाण आहेत जी पावसाळ्यात पाहण्यासारखी आहेत. हिरवेगार उंच डोंगर, झाडी आणि आल्हादायक वातावरण कोणालाही आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करत आहात तर ही बातमी वाचाच. कारण काही पर्यटनाची ठिकाणं पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत ज्याठिकाणी पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पर्यटक आवर्जुन भेट देतात. मात्र याठिकाणी काही वेळा जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. यामुळे कायदा सुव्यस्था राखण्यासाठी धबधबा, धरण, तलाव क्षेत्रात जीवितहानी होऊ नये यासाठी खालापूर, कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी व त्याच्या १ किमी परिसरात प्रतिबंधात्कम आदेश लागू केले आहेत. 10 जून ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आदेश मोडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. कर्जत तालुक्यातील एकूण 18 आणि खालापूर तालुक्यातील 14 अशा एकूण 32 पर्यटनस्थळे व परिसरात आजवर घडलेल्या दुर्घटनांच्या पाहता पावसात पर्यटकांकरिता बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

कर्जतमधील पर्यटनासाठी बंदी असलेली ठिकाणं

● खांडस धरण

- Advertisement -

● पाषाणे धरण

● पाली भूतिवली

- Advertisement -

● डोंगरपाडा धरण

● बेकरे कोल्हा धबधबा

● बेडीसगाव धबधवा

● आनंदवाडी धवधवा

● मोहिली धवधवा

● आषाणे कोषाणे धबधबा

● पळसदरी धरण

● कोंढाणे धवधवा

● अवसरे धरण

● साळोख धरण

खालापूरमधील बंदी लागू असलेली पर्यटनस्थळे

● धामणी कातकरवाडी तलाव

● पोखरवाडी बंधारा बोरगाव

● आडोशी धवधवा व परिसर

● मोरबे धरण

● बोरगाव धबधवा

● कोमलवाडी धबधबा

● टपालवाडी धबधबा

● जुम्मापट्टी धबधबा

● वदप धबधबा

● पळसाचा बंधारा

● डोणवत धरण

● सोलनपाडा धरण

● माडप धबधबा

● झेनिथ धवधवा व परिसर

● आडोशी पाझर तलाव

● नढाळ / वरोसे धरण

● बावलें बंधारा

●कलोते धरण

● भिलवले धरण

नागरिकांना प्रतिबंधात्मक आदेश –

१) पावसाळ्यातील नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे गुन्हा

२) याशिवाय मद्य बाळगणे, उघड्यावर मद्य सेवन करणे त्याची वाहतूक आणि अनधिकृत विक्री करणेही कायद्याने गुन्हा

३) पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई

४) तसेच कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करण्यास मनाई

५) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे गुन्हा

६) सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरण्यास मनाई

७) वाहतुकीच्या रस्त्यावर तसेच धोकादायक ठिकाणांवर वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन चालविणे या सगळ्यास बंदी आहे.


शरद पवारांना भारतीय कुस्ती संघटनेचा धक्का: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच बरखास्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -