डॉक्टर्स डेच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने चाहत्यांना दिली “डॉक्टर जी” ची खास भेट

डॉक्टर्स दिनाच्या या विशेष प्रसंगी आयुष्मान खुराना यांनी सर्व मेहनती डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत ज्यांनी आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे

डॉक्टर्स दिनानिमित्त, आयुष्मान खुरानाने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘डॉक्टर जी’च्या टीमने चित्रपटातील त्याचा लूक सादर केला आहे. जंगली पिक्चर्स निर्मित हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप यांनी केले आहे. या कॅम्पस कॉमेडी ड्रामा चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री शेफाली शाह त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये असणार आहेत.

डॉक्टर्स दिनाच्या या विशेष प्रसंगी आयुष्मान खुराना यांनी सर्व मेहनती डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत ज्यांनी आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. हा लुकसोबतच त्याने आपल्या चाहत्यांना डॉक्टर जी मधील ‘जी’ म्हणजे काय? याची देखील झलक सादर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Junglee Pictures (@jungleepictures)

आयुष्मान खुराना ने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील आपल्या लुकची लेटेस्ट झलक शेयर करताना लिहिले की,’डॉक्टर जी’चे निर्माते हा दिवस चित्रपटातील आयुष्मान खुरानाच्या व्यक्तिरेखेच्या या नवीन फोटोसह साजरा करण्याची अशी आशा करत आहेत. हा चित्रपट आयुष्मान खुरानाच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक आहे. डॉक्टर जी व्यतिरिक्त, जंगली पिक्चर्सकडे 2022 मध्ये ‘वो लड़की है कहां?’, ‘डोसा किंग’, ‘उलज’ आणि ‘क्लिक शंकर’ सारख्या थ्रिलर्सची मोठी यादी तयार आहे.


हेही वाचा :आगामी RK/RKAY चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित