घरमनोरंजन3 वर्षानंतर भारतात परतलेल्या प्रियंका चोप्राने मुंबईतील मरिन ड्राइव्ह केली मौजमस्ती; व्हिडीओ व्हायरल

3 वर्षानंतर भारतात परतलेल्या प्रियंका चोप्राने मुंबईतील मरिन ड्राइव्ह केली मौजमस्ती; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आपल्या अभिनयाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध असणार देसी गर्ल प्रियंका चोप्रा जवळपास 3 वर्षानंतर भारतात परत आली आहे. भारतामध्ये आल्यापासून प्रियंका अनेक ठिकाणी भेट देत आहे. सध्या ती मुंबईमध्ये आपले खास क्षण घालवत आहे. यासंबंधीत फोटो आणि व्हिडीओ देखील प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती मुंबईतील मरिन ड्राइव्हवर मजा करताना दिसत आहे. या वेळी प्रियंकाने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. तसेच यामध्ये प्रियंका वेगवेगळ्या पोज देखील देत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “एक जुन्या कट्ट्यावर थांबणं…केवळ एका मिनिटासाठी, मुंबई मी तुला खूप मिस केलं! आता कामावर परत.”

- Advertisement -

दरम्यान, आता सोशल मीडियावर प्रियंकाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रियंकाचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. प्रियंका भारतामध्ये तिच्या आगामी चित्रपटांसाठी आली आहे. येत्या काळात ती फरहान अख्तरच्या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

अमेरिकन गायक निक जोनससोबत झालं लग्न
2015 मध्ये प्रियंका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, ज्यानंतर दोघं तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2018 मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. यंदा प्रियांका आणि निक जोनस जानेवारीमध्ये एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.

- Advertisement -

हॉलिवूडमध्ये देखील अभिनयाची छाप
प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये तिने सतीची भूमिकेत दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


हेही वाचा :

अक्षयच्या ‘राम सेतू’ने 9 दिवसात कमावले केवळ एवढे कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -