घरमनोरंजनतू ही शिवरायांची भूमिका करायला हवी... अक्षय कुमारला राज ठाकरेंनी दिला सल्ला

तू ही शिवरायांची भूमिका करायला हवी… अक्षय कुमारला राज ठाकरेंनी दिला सल्ला

Subscribe

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते. महेश मांजरेकरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. बुधवारी झालेल्या सोहळ्यात अक्षयच्या फर्स्ट लूकची झलकही दाखवण्यात आली.

तसेच यावेळी अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारण्यामागचे कारणही स्पष्ट केले. यावेळी तो म्हणाला की, “मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. माझी सर्व ताकद मी यासाठी लावेन”.

- Advertisement -

तसेच या सोहळ्यात जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणारे विराज मडके, तुळजा जामकर यांची भूमिका साकारणारे जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, वर्ष 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -