रजनीकांत आणि त्रिशा येणार सिनेमात एकत्र

कार्तिक सुब्बराज यांचा हा सिनेमा असला तरी या सिनेमाचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. आता रजनीकांत आणि त्रिशाच्या चाहत्यांना या सिनेमाच्या नावाची उत्सुकता आहे

rajni and trisha together
(फोटो सौजन्य- कामधेनू)

सुपरस्टार रजनीकांतचा काला सिनेमा सुपर-डुपर हिट झाला हे सांगायलाच नको. पण आता त्यांच्या फॅन्सना त्यांच्या नव्या सिनेमाची प्रतिक्षा आहे. आता ही प्रतिक्षा संपली असून लवकरच एका नव्या सिनेमात रजनीकांत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रजनीकांत सोबत त्रिशा स्क्रिन शेअर करणार आहे. या संदर्भातील माहिती त्रिशाने स्वत:तिच्या ट्विटरवरुन दिली आहे. त्यामुळे आता रजनीकांत आणि त्रिशा यांच्या फॅन्सना या सिनेमाची प्रतिक्षा असणार आहे.

कोणता सिनेमा?

कार्तिक सुब्बराज यांच्या सिनेमात त्रिशा आणि रजनीकांत एकत्र काम करणार अशी चर्चा होती. या चर्चेला फुलस्टॉप मिळाले असून आता हीच जोडी या नव्या सिनेमात दिसणार आहे. स्वत: त्रिशाने ही माहिती दिली आहे. हा सिनेमाचा आनंद तिने तिच्या ट्विटरवरुन व्यक्त केला आहे. या आधी त्रिशाने तेलगू आणि तामिळ अभिनेत्यांसोबत सिनेमे केले आहेत. पण रजनीकांत सोबत ती पहिल्यांदाच सिनेमा करणार आहे. विशेष म्हणजे ती या सिनेमात रजनीकांत यांची सहअभिनेत्री आहे. या शिवाय सिनेमात विजय सेतूपती, नवाजुद्दीन सिद्दकी, सिमरन आणि बॉबी सिम्हा देखील आहेत.

सिनेमाच्या नावाची उत्सुकता

कार्तिक सुब्बराज यांचा हा सिनेमा असला तरी या सिनेमाचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. आता रजनीकांत आणि त्रिशाच्या चाहत्यांना या सिनेमाच्या नावाची उत्सुकता आहे. या सिनेमासाठी ६५ कोटी रुपये रजनीकांत यांनी दिले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या सिनेमाचे शुटींग सुरु झाले असून लवकरच या त्रिशादेखील सेटवर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.