Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी राखीने जाहीर केले 'खतरो के खिलाडी ११' च्या विजेत्याचे नाव, पहा काय...

राखीने जाहीर केले ‘खतरो के खिलाडी ११’ च्या विजेत्याचे नाव, पहा काय म्हणाली राखी

खतरो के खिलाडी हा शो सुरु होत नाही तर राखीने आता कोण जिंकणार आहे हे देखील सांगून टाकले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi sawant) नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच ‘खतरो के खिलाडी ११’ ( khatron ke khiladi 11) मधील स्पर्धक केपटाऊनहून शुटींग करुन भारतात परतले आहेत. याच दरम्यान राखी सावंत हिने खतरो के खिलाडी ११ विषयी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यामुळे राखी सध्या चर्चेत आली आहे. राखीने थेट खतरो के खिलाडी ११ च्या विजेत्याचे नाव सांगून टाकले आहे. खतरो के खिलाडी हा शो सुरु होत नाही तर राखीने आता कोण जिंकणार आहे हे देखील सांगून टाकले आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर पापाराझी यांच्यासोबत बोलत असताना राखीने खतरो ते खिलाडी ११ च्या विजेत्याचे नाव सांगितले आणि तिचे बोलणे पापाराझींच्या कॅमेरात कैद झाले. (Rakhi sawant told paparazzi the name of the winner of ‘Khatro Ke Khiladi 11 )

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Jiffy (@bollywood_jiffy)


‘आता सगळे स्पर्धक परत आले आहेत. क्या बात है. वेलकम वेलकम असे राखीने म्हटल्यानंतर  पापाराझींनी अर्जुन बिजलानी यांचे नाव घेताच राखीने अरे अर्जुन बिजलानी जिंकला? तोच जिंकणार. असे म्हणत खतरो के खिलाडी ११ चा विजेत्या स्पर्धकाचे नाव सांगून टाकले. राखीने मारलेला तुक्का आता किती खरा आणि खोटा निघतो हे अर्जुन शोमध्ये आल्यानंतरच कळेल. मात्र सध्या राखीने जाहीर केलेल्या या विजेत्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

पापाराझींनी नंतर राखीला अभिनव शुक्ला यांच्याविषयी विचारले असता, आता सगळे आले आहेत चांगलं आहे, असे म्हटले. राखी आणि अभिनव शुक्ला यांना प्रेक्षकांनी बिग बॉस १४ मध्ये पाहिले होते. बिग बॉसमध्ये असताना राखीने अभिनव बद्दलच्या तिच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.


हेही वाचा –

- Advertisement -

 

- Advertisement -