घरमनोरंजन'राम सेतु' आणि 'थँक गॉड' चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित; कोण ठरणार...

‘राम सेतु’ आणि ‘थँक गॉड’ चित्रपट एकाच दिवशी होणार प्रदर्शित; कोण ठरणार वरचढ?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष चित्रपटांच्या बाबतीत फारसे चांगले गेले नाही. 2022 मध्ये अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षा बंधन’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, यांपैकी अक्षय कुमारचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही. अक्षय कुमारचे हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

दरम्यान, आता अक्षय कुमारचा आणखी एका चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. येत्या 25 ऑक्टोबर रोजी अक्षयचा ‘राम सेतू’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षट एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारताना दिसेल जो भगवान राम यांच्या कथेमधील समुद्रावर दगडांपासून तयार करण्यात आलेल्या पुलाच्या शोधात आहे.

- Advertisement -

या चित्रपटामध्ये अक्षय आणि त्याचे मित्र हा पुल वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ट्रेलरचं कौतुक केलं होतं. त्यामुळे कदाचित अक्षयच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु याचं चित्रपटासोबत अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह यांचा ‘थँक गॉड’ चित्रपट देखील याचं दिवशीत होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडे आता अक्षय आणि अजयचे ऑप्शन असणार आहे. गुरुवार संध्याकाळपासून दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे आणि तिकिट विक्री देखील सुरु झाली आहे.

‘राम सेतु’ आणि ‘थँक गॉड’ चित्रपटात काटे की टक्कर
‘राम सेतु’ चित्रपटाने 9 हजारांपेक्षा जास्त तिकीट विकले आहेत. ‘राम सेतु’ चं अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शन 25 लाखांच्या पार गेले आहे. तर अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाने 6 हजारांपेक्षा जास्त तिकीट विकले. या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शन 15 लाखांच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्राचा नटसम्राट प्रशांत दामले

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -