राकेश बापटने रिलेशनशिपवर केलं वक्तव्य, ‘शमिता माझी चांगली मैत्रीण’

शमिता आणि राकेश यांच्यामध्ये मतभेद असल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Raqesh Bapat on his bond with Shamita Shetty Would not name it relationship She is a dear friend
राकेश बापटने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, शमिता चांगली मैत्रीण

अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat) यांची ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये (Big Boss OTT ) चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. बी-डाऊनपासून ते सोशल मीडियापर्यंत या दोघांच्या रिलेशनशिपची (Relationship) तुफान चर्चा सुरु आहे. मात्र या दोघांचे रिलेशन फक्त बिग बॉसमध्ये पब्लिसिटी मिळवण्यापुरते होते असे सोशल मीडियावर बोलले जाते आहे. परंतु सोशल मीडियावर आता त्याच्या ब्रेकअपच्या (Breakup) चर्चांना उधाण आले आहे. शमिता आणि राकेश यांच्यामध्ये मतभेद असल्याने त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राकेश आणि शमिता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. शमिताच्या वाढदिवशी देखील राकेश तिच्या कुटुंबियांसोबत दिसला. एवढचं नव्हे तर त्यांना खूपदा एकत्र फिरताना देखील दिसले. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या मतभेद सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते लवकरचं वेगळे होणार असल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राकेश शमिता शेट्टीला प्रियसी असे बोलताना अडखळा आणि ती आपली चांगली मैत्रीण असल्याचे सांगितले. आमच्या एक चांगले बॉन्डिंग आहे, असेही त्याने सांगितले. राकेश पुढे म्हणाला की, ती माझी चांगली मैत्रीण आहे. जर तुमचं मन चांगल असेल तर कोणत्याही गोष्टीचा त्यावर परिणाम होत नाही. आम्ही प्रामाणिक आहोत आणि आम्ही एकमेकांचा आदरही करतो. आमच्या आवडी निवडी एकसारख्या आहे.

शमिता आणि तु रिलेशनशिपमध्ये आहेस का या प्रश्नावर उत्तर देताना राकेश म्हणाला की, ‘मी याला रिलेशनशिप म्हणणार नाही तर आमच्यामध्ये एक चांगला बॉन्ड आहे. आपण फक्त एखाद्या गोष्टीला नाव देण्याच्या मागे असतो. पण जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबतचा सहवास एन्जॉय करतात. तेव्हा त्याला नाव दिलं जातं. मी शमिताचा नेहमीच आदर करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.