घरताज्या घडामोडी'रौद्र' मराठी सिनेमाचा ट्रेलर अन् म्युझिक लाँच

‘रौद्र’ मराठी सिनेमाचा ट्रेलर अन् म्युझिक लाँच

Subscribe

सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निलेश मोहरीर याच्या हस्ते पार पडला. 

शोधाची थरारक आणि तितकीच रंजक कथा असलेला रौद्र हा सिनेमा येत्या १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्याआधी सिनेमा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निलेश मोहरीर याच्या हस्ते पार पडला.   राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी ही फ्रेश जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आहे.  त्याचप्रमाणे दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ हे कलाकारही सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध या सिनेमातून घेतला जाणार आहे.  ‘रौद्र’ सिनेमाची कथा ही एका रहस्यभेदाभोवती फिरते. एका पुरातन अमूल्य अशा गोष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी गावात आलेला नायक एका बखरीत असलेल्या वेगवेगळया कोडयांमार्फत रहस्याचा शोध घेत असतो. ही कोडी तो कशाप्रकारे उलगडणार? या कोडयातून त्याला काही गवसणार? की तो त्याच चक्रात अडकणार ? याची रंजक पण थरारक कथा रौद्र मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

- Advertisement -

रौद्रची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांनी लिहील असून  रविंद्र शिवाजी यांनी पटकथा आणि संवाद  लिहिलेत. तर सिनेमाती निर्मिती मंगेश बाळासाहेब गटकळ तर सहनिर्माते समीर किसन गाडे यांनी केली आहे. सिनेमात हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार यांनी उत्तम गाणी गायली आहेत.


हेही वाचा –  चिरंजीवीच्या Godfatherमध्ये सलमानची एंट्री, पहिल्यांदाच करणार दाक्षिणात्य सिनेमात काम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -