घरठाणेशहापूर शहराला मिळणार लवकरच शुद्ध आणि मुबलक पाणी

शहापूर शहराला मिळणार लवकरच शुद्ध आणि मुबलक पाणी

Subscribe

शहापूर शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी शहापूर नगरपंचायतीच्या नागरिकांची सातत्याने मागणी होती. बुधवारी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहापूर शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथे संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत येत्या १५ दिवसांत नवीन पाणी योजनेला तांत्रिक मान्यता दिली जाईल तसेच लवकरच पाणी आरक्षण संदर्भात जलसंपदा मंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिल्या या बैठकीला हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपनगराध्यक्ष विजय भगत, नगरसेविका अश्विनी अधिकारी, नगरसेविका गीता भोईर, नगरसेवक राजाराम वळवी,नगरसेवक आनंद झगडे, नगरसेवक रणजित भोईर, शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिरडे, संपर्क प्रमुख आकाश सावंत,व उपशहर प्रमुख मिलिंद भोईर म.जि.प्र चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा सर, म.जि.प्रा. मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता .अरूण निरभवणे, भातसा विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, पाणी पुरवठा मंत्री यांचे खाजगी सचिव अशोक पाटील, मुख्याधिकारी वैभव गारवे, तसेच पाणीपुरवठा योजनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

शहापूर नगरपंचायत निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूरातील जनतेला शब्द दिला होता की शहापूर शहराच्या जनतेला लवकरच शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा योजना देणार असल्याची घोषणा केली होती.त्याची वचनपूर्ती लवकरच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -