रेमो डिसूजाने शेअर केला पत्नी लिझेलचा ट्रांसफॉर्मेशन फोटो म्हणाला, तुझ्यावर गर्व आहे

रेमो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो त्याने नुकतच लिझेलसोबतचे फोटो शेअर केले असून, ज्यात ती बरीच फिट दिसत आहे.

Remo D'Souza lauds wife Lizelle's stunning weight loss journey
रेमो डिसूजाने शेअर केला पत्नी लिझेलचा ट्रांसफॉर्मेशन फोटो म्हणाला, तुझ्यावर गर्व आहे

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगच्या(Bharti Sigh) ट्रांन्सफॉर्मेशन लूकची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत होती. आता भारती नंतर कोरियोग्राफर रेमो डिसूजाची (Remo dsoza)पत्नी लिझेलचा फॅट टू फिट फोटो इस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. रेमोने सोशल मीडियावर(Social Media) त्याच्या पत्नीचा हा फोटो पोस्ट केला असून या कोलाज फोटोमध्ये लिझेलमध्ये संपूर्ण बदल झाल्याचे दिसून येत आहे. या पोस्टवर अभिनेता वरुण धवन, कीकू शारदा,जय भानुशाली सहित अनेक कलाकारांनी लिझेलची प्रशंसा केली आहे.(Remo D’Souza lauds wife Lizelle’s stunning weight loss journey)

रेमो डिसूझाने लिझेलसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये एका बाजूला लिझेलचे वजन वाढलेले दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला फोटोमध्ये तिला ओळखणे कठीण वाटत आहे. ती पूर्णपणे फिट आणि जबरदस्त आकर्षक दिसते. मात्र, लिझेलने स्वतःला पूर्णपणे बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, ज्याचे रेमोने कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमोने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले ‘इथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली, पण सर्वात मोठी लढाई माझ्याशी आहे आणि मी लिझेलला ही लढाई लढताना आणि अशक्य साध्य करताना पाहिले आहे. मी नेहमी म्हणायचो की हा तुमचा मेंदू आहे, जो तुम्हाला मजबूत करायचा आहे आणि तुम्ही ते लिझेल केले, मला तुझा अभिमान आहे. तू माझ्यापेक्षा बलवान आहेस तू मला प्रेरणा दे तुझ्यावर प्रेम आहे.’ यासह, रेमोने #weightlossjourney #healthylifestyle #healthyfood #nooffdays #fitnessmotivation सारखे हॅशटॅग वापरले आहेत.

रेमो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो त्याने नुकतच लिझेलसोबतचे फोटो शेअर केले असून, ज्यात ती बरीच फिट दिसत आहे.रेमो रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस 6’  जज करत असून  लिझेल सेटवरही अनेक वेळा दिसली आहे. रेमो इन्स्टाग्रामवर लिझेलसोबत मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो.


हे हि वाचा – शमिता आणि शिल्पा तुमच्या बहिणी आहेत का?,सुनंदा शेट्टीला नेटकऱ्याने केला सवाल