घरमनोरंजनअमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला रोहित पवारांची पसंती

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला रोहित पवारांची पसंती

Subscribe

हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे..

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवे गाणे प्रदर्शित केले. महिला दिनाचे औचित्य साधत ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणे शेअर केले आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यामुळे, फॅशनमुळे आणि राजकीय टीकांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ह्यावेळेस त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ‘कुणी म्हणाले वेडी कुठली’ असे या गाण्याचे बोल आहेत. स्त्री शक्ति वर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे हे गाणे प्रदर्शित झाले आहे. स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे या विषयावर आधारित हे गाणे आहे. एखादी स्त्री काही नवे करु इच्छिते तेव्हा तिला वेडी कींवा खुळी असे हिणवले जाते. या गाण्यात एका मुलीला तिच्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत. तिला नृत्याची फार आवड असून तिच्या आई-वडिलांचाही तिला पाठिंबा आहे, मात्र तिचे आजोबा तिच्या आवडीच्या विरोधात असल्याचे दाखवले आहे.हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

नेटकऱ्यांसह रोहित पवारांनी केले कौतुक 

अमृता फडणवीस यांचे हे नवे गाणे ह्यावेळेस अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस आले. याशिवाय, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचे आणि त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असे नाही, पणअमृता  ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, अशा शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Budget Session Live Update: विधानसभा कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -