घरताज्या घडामोडीHunarbaazच्या मंचावर पोहोचला रोहित शेट्टी, मिथुन दांसोबत धम्माल BTS व्हिडीओ व्हायरल

Hunarbaazच्या मंचावर पोहोचला रोहित शेट्टी, मिथुन दांसोबत धम्माल BTS व्हिडीओ व्हायरल

Subscribe

हुनरबाज देश की शान या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती सोबतच करण जोहर आणि परिणीती चोप्रा देखील जज आहे. तर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया शो होस्ट करतात.

हुनरबाज देश की शान या कॉमेडी रिअँलिटी शोमध्ये स्पर्धक आपल्या अनोखी शैलीने सर्वांचे मनोरंजन करत असतात. स्पर्धकांप्रमाणे शोचे जजेस आणि होस्ट देखील सेटवर शुटींगदरम्यान मज्जा करत असतात. निर्माते शोचे अनेक मजेदार बिहाइंड द सीन्स ( BTS ) व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच शोमध्ये रोहीत शेट्टीने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी रोहीत शेट्टी मिथुन चक्रवर्तींसोबत धम्माल मस्ती करताना दिसला. हुनरबाज देश की शान या शोमध्ये मिथुन चक्रवर्ती सोबतच करण जोहर आणि परिणीती चोप्रा देखील जज आहे. तर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया शो होस्ट करतात.

शोच्या लेटेस्ट BTS व्हिडीओमध्ये सर्व जज रोहीत शेट्टी सोबत स्टेजवर दिसत आहेत. यावेळी रोहीत शेट्टी मिथुन दांच्या पायापासून डोक्यावर हाथ फिरवत म्हणतो, ही पाहा कमाल, फुल रॉकस्टार असे म्हणत दाद तुम्ही काही बोलू इच्छिता का असे म्हणतो. त्यावर मिथुन दा म्हणतात, मी हेच म्हणेन इथे सगळे मला काउबॉय समजतात पण मी हॉर्स बॉय आहे. यावर परिणीती आणि भारती पोट धरुन हसायला लागातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -


त्यानंतर करण जोहर फ्रेममध्ये येतो. करणने जॅकेट घालते आहे ज्यावर भरपुर पर्ल्स वर्क केलेले आहे. करणच्या जॅकेटवर प्रश्न करत रोहीत त्याला विचारतो, हे काय आहे? त्यावर करण मजेशीर उत्तर देत म्हणतो, हे मम्मीचे दागिने आहेत. मी तिचा निकलेस घेतला त्यावचे पर्ल्स काढले आणि सकाळी लवकर उठून कोणाच्या नकळत पॅकेटला लावले. करणच्या उत्तराने स्टेजवर सगळेच हसायला लागतात.


हेही वाचा – Saif Ali Khan ची कार्बन कॉपी मुलगा jeh; बहीण saba Ali Khan ने शेअर केला फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -