घरमनोरंजनसैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने केलं बॉलिवूडमध्ये डेब्यू, करण जोहर सोबत करणार...

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने केलं बॉलिवूडमध्ये डेब्यू, करण जोहर सोबत करणार काम

Subscribe

सिनेमात इब्राहिम असिस्टंन डायरेक्टर म्हणून काम करणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा (saif ali khan) मोठा मुलगा इब्राहिम अली खान (ibrahim ali khan) सिनेसृष्टीतील झगमगाटापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनेक पार्ट्या, इवेंट, प्रमोशन दरम्यान इब्राहिम हमखास हजेरी  लावतो. आता इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरचा (karan johar) आगामी सिनेमा ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या सिनेमातून इब्राहिम बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार करणने एक हलकीशी हिंट देत इब्राहिम देखील सिनेमात काम करत असल्याचे वक्तव्य केलं आहे.(saif ali khan son ibrahim to make bollywood debut in karan johar film)

इब्राहिमच्या पालकांनी म्हणजेच अमृता आणि सैफने आली खान यांनी इब्राहिमने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी संपूर्ण फिल्ममेकिंग आणि कॅमेरा कसा हाताळावा याचं शिक्षण घेण्याकरीता करणशी संपर्क साधला होता. यानंतर करणने होकार दिला. रॉकी और रानी की प्रेम कहाणी सिनेमात इब्राहिम असिस्टंन डायरेक्टर म्हणून काम करणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये आलीया भट्ट,रणवीर सिंह, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी या दिग्गज कलाकारांची फळी झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरने सिनेमाबाबत एक पोस्ट शेअर केली होती. तसेच पोस्टला कॅप्शन देत लिहलं होतं की, ” शेवटी हा दिवस उजाडला. या क्षणी माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत आहेत. आणि सर्वात पहिला विचार आहे तो म्हणजे आभार मानणे, आज आम्ही सिनेमाच्या पहिलं शेड्यूल सुरू करत आहोत. आम्हां सर्वांना तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे. रोल करण्याची वेळ आली आहे.”

- Advertisement -

हे हि वाचा – रणवीरने लावले दीपिका समोर ठुमके, व्हायरल व्हिडिओवर चाहते झाले फिदा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -