घरमनोरंजनसलमान खान, फरहान, झोया बनवणार,सलीम खान-जावेद अख्तरवर सिनेमा

सलमान खान, फरहान, झोया बनवणार,सलीम खान-जावेद अख्तरवर सिनेमा

Subscribe

लवकरच सलमान खान फिल्म्स, एक्सेल एंटरटेनमेंट, टाइगर बेबी फिल्म्स एकत्र येत सलीम खान और जावेद अख्तर वर आधारित डॉक्यूमेंट्री फिल्म 'एंग्री यंग मॅन' निर्माण करणार आहेत.

बॉलिवूड मधिल दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan)सध्या कमालीचा व्यस्त आहे. त्याच्याकडे आगामी सिनेमांच्या शुटिगं शेड्यूल सेट करण्यासाठी निर्मांत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आशातच आता सलमान त्याचे वडील सलीम खान (Salman Khan) आणि जावेद अख्तरवर (Javed Akhtar) एक डॉक्यूमेंट्री सिनेमा (documentary film)बनवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांची जोडी 70 च्या दशकात खुप हिट ठरली होती. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमाचे स्क्रीनप्ले लिहले आहेत तसेच त्याचे आनेक गाजलेले किस्से देखिल आहेत. आणि या डॉक्यूमेंट्री सिनेमाचे मुख्य वैशिष्ट्य हा सिनेमा जावेद आणि सलीम यांचे सर्व मुलं एकत्र मिळून हा सिनेमा बनवणार आहे. हा सिनेमा सलमान खान, फरहान(Frhan Akhtar), जोया अख्तर (Zoya Akhtar)प्रोड्यूस करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

लवकरच सलमान खान फिल्म्स, एक्सेल एंटरटेनमेंट, टाइगर बेबी फिल्म्स एकत्र येत सलीम खान और जावेद अख्तर वर आधारित डॉक्यूमेंट्री फिल्म ‘एंग्री यंग मॅन’ निर्माण करणार आहेत. तसेच या सिनेमाचे दिग्दर्शन नम्रता राव करणार आहे. या सिनेमाची माहिती प्रसिद्ध चित्रपट समीक्षत तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टग्राम अकांऊटवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. माहितीनुसार या सिनेमात सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही महत्वपुर्ण घटनांचा उलगडा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. ‘शोले’, ‘क्रांति’, ‘डॉन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सीता और गीता’, ‘जंजीर’ ‘यादों की बारात’ सारखे अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या सलीम-जावेद यांची जबरदस्त जोडीवर तयार होत असणारा  डॉक्यूमेंट्री सिनेमा पाहण्यास चाहते खुप उत्सुक असल्याचे दिसत आहे.


हे हि वाचा – AmazonPrime : ‘मैं शेरनी’ टायटल ट्रॅकमध्ये विद्याचा दमदार अंदाज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -