घरमनोरंजन... तर ती जिवंत राहिली नसती, ऐश्वर्या राय मारहाणप्रकरणी सलमानने केला खुलासा

… तर ती जिवंत राहिली नसती, ऐश्वर्या राय मारहाणप्रकरणी सलमानने केला खुलासा

Subscribe

दोन्ही सेलिब्रिटींचे फॅन्स त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सूक असतात. अशीच उत्सुकता वाढवणारी आणि भुवया उंच करणारी माहिती समोर आली आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या ब्रेकअपची चर्चा आजही रंगते. या दोघांच्या नात्याबाबत अनेकदा अनेक बातम्याही प्रसिद्ध होत असतात. दोन्ही सेलिब्रिटींचे फॅन्स त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. अशीच उत्सुकता वाढवणारी आणि भुवया उंच करणारी माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये ऐश्वर्या रॉय आणि सलमानच्या नात्याबाबत माहिती समोर आली आहे. (… then she would not have survived, Salman reveals in Aishwarya Rai case)

हेही वाचा – पलक तिवारीची सलमान खानच्या बिग बजेट चित्रपटात एन्ट्री; या अभिनेत्यासह करणार अभिनय

- Advertisement -

ब्रेकअपनंतर सलमान खान आपल्याला मारायचा असं एकदा ऐश्वर्या रॉयने सांगितलं होतं. याच प्रश्नांबाबत सलमानला नुकतंच एका पत्रकाराने छेडलं. या प्रश्नाचं उत्तर सलमान खानने अगदी हटके पद्धतीने दिलं आहे.

या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान खान म्हणाला की, काही दिवसांपूर्वी प्रभु चावलाने हा प्रश्न मला विचारला तेव्हा मी टेबलवर हात मारला आणि टेबल तुटला. मी कोणाला मारतोय तर आमच्यात वाद सुरू आहे हे जाहीर आहे. जर मी तसं केलं असतं तर मला वाटत नाही ती जगली असती.

- Advertisement -


हेही वाचा सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची जबरदस्त एंट्री

१९९९ साली हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या जास्त जवळ आले होते. त्यांनी जवळपास तीन वर्ष एकमेकांना डेट केलं. मात्र, त्यानंतर त्या दोघांचं नातं तुटलं. मी एक स्वाभिमानी महिला असल्याने हे नातं तोडत आहे, असं ऐश्वर्याने म्हटलं होतं.

माझे इतर स्टार्ससोबत अफेसर असल्याचं म्हणत तो माझ्यावर संशय घ्यायचा. काहीतरी भांडणं काढून तो मला मारहाण करायचा, असंही ऐश्वार्याने म्हटलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -