घरमनोरंजनSalman Khan : भाईजानची चाहत्यांना ईदी, नव्या चित्रपटाची केली घोषणा

Salman Khan : भाईजानची चाहत्यांना ईदी, नव्या चित्रपटाची केली घोषणा

Subscribe

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटांची क्रेझ वेगळीच आहे. चाहत्यांनाही त्याचे चित्रपट खूप आवडतात आणि सल्लू भाईचा पुढचा चित्रपट कधी येईल याची वाट पाहत राहतात. सलमान खान आणि ईद हे समीकरण बरीच वर्ष बॉलिवूडमध्ये पाहायला आपल्याला मिळतं. पण यंदाची ईद सलमानच्या चाहत्यांना रुखीसुखी जाईल असे वाटत होते. कारण यंदा त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण भाईजानही आपल्या चाहत्यांना नाराज होऊ देणार नाही.

सलमान खानने चाहत्यांना ईदच्या निमित्ताने ‘ईदी’ दिली आहे. 11 एप्रिलच्या पहाटे त्याने चाहत्यांना खास भेट दिली. त्याने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानचा हा नवा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नावही ठरलं आहे. ‘सिंकदर’ (Sikandar) असे या चित्रपटाचे नाव आहे. निर्माते साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक ए आर मुरुगादास या नवीन ‘सिकंदर’ या चित्रपटातून एकत्र येणार आहेत.

- Advertisement -

चाहत्यांना मनोरंजनाची ईदी देताना सलमानने ट्वीट केले आहे की, “यंदाची ईद ही ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ सोबत साजरी करा आणि पुढील वर्षीची ईद ही ‘सिंकदर’ (Sikandar) सोबत साजरी करा तुम्हा सर्वांना ईद मुबारक! चित्रपटाचं दिग्दर्शन एआर मुरुगदास करतील, तर निर्मिती साजित नाडियाडवालांची असेल”, अशी पोस्ट सलमान खानने केली आहे.

मागील वर्षी सलमानचा ‘टायगर-3’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये कतरिना कैफ, इमरान हाश्मीची भूमिका होती. यशराज फिल्मसच्या स्पाय युनिर्व्हस सीरिजमधील हा चित्रपट होता. करण जोहरसोबतचा ‘द बुल’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘टायगर व्हर्सेस पठाण’ हे चित्रपटही आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

- Advertisement -

__________________________________________________________________

हेही वाचा : भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचा ओटीटीवर डिजिटल प्रीमियर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -