samantha naga chaitanya : समांथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? ज्योतिषाची भविष्यवाणी

samantha naga chaitanya divorce astrologers shocking predication
samantha naga chaitanya : समांथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट? पंडिताने केली भविष्यवाणी

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा आणि पती नागा चैतन्य यांची जोडी सिने इंडस्ट्रीत सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे. मात्र सध्या त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे बातम्या समोर येत आहे. अशातच दोघेही लवकरचं घटस्फोट घेणार असल्याच्याही चर्चा रंगत आहेत. समांथा आणि नागा चैतन्य यांच्यातील दुराव्याच्या बातम्या ऐकून चाहत्यांना धक्काच बसला आहे. तर काही चाहते यावर निराशा व्यक्त करत आहे. त्यामुळे चाहत्यांकडून दोघांनी लकरचं एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे दोघे लवकरचं घटस्फोट घेणार आहेत. मात्र या चर्चांवर दोघांनीही अद्याप अधिकृत माहिती जाहीर केली नाही. एका वृत्तसंस्थेच्या त्यांच्या अहवालात ज्योतिष जगन्नाथ गुरुजींचे भाकीत सांगितले आहे. दोघांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये खूप फरक आहे. कारण नागाचे लक्ष जास्त कुटुंबाकडे आहे आणि समांथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करु पाहतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

यावर बोलताना ज्योतिष जगन्नाथ गुरुजींनी सांगितले की, या दोघांच्या नात्यामध्ये तणावाचे कारण करिअर असू शकते. याशिवाय कुटुंबियांमुळे दोघांमध्ये काही वाद निर्माण झाला असेल. जर समांथा आणि नागामधील मतभेद कुटुंबियांनी हस्तक्षेप करत वेळीच मिटवले असते तर हे नातं टिकले असते. त्यांना मुलं देखील नाहीत. मुलं असती तर त्यांनी घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला असता. त्यामुळे दोघांचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे.

ज्योतिष जगन्नाथ पुढे सांगतात, नागा आणि समांथा दोघेही खूप हुशार आहेत. त्यामुळे दोघंही घाईघाईत कोणता निर्णय घेत नाहीत. मात्र दोघांच्या विभक्त होणाऱ्या चर्चांवरून सर्वांनाच धक्का बसला आहे. अशातच दोघांना मागील सर्व विसरुन पुन्हा एकत्र येण्याची इच्छा आहे. अशा चर्चा आहेत.