घरमनोरंजनआता डान्सिंग अंकल करणार शॉर्टफिल्म

आता डान्सिंग अंकल करणार शॉर्टफिल्म

Subscribe

का शॉर्टफिल्ममध्ये काम करणार असल्याचं संजीव श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितलं आहे. 'कॉलेज अॅडमिशन अँन्ड डॅड' असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे.

आपल्या जबरदस्त डान्सनं एका रात्रीत सुपरस्टार झालेले डान्सिंग अंकल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. डान्सिंग अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव लवकरच चित्रपटसृष्टीत येत आहेत. त्यांचा गोविंदाचा केलेला डान्स प्रसिद्ध झाल्यानंतर संजीव श्रीवास्तव यांना टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमधूनही पाहुणा म्हणून बोलावणं आलं होतं. तर आता लवकरच डान्सिंग अंकल अभिनय करतानाही दिसणार आहे. आपण एका शॉर्टफिल्ममध्ये काम करणार असल्याचं संजीव श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितलं आहे. ‘कॉलेज अॅडमिशन अँन्ड डॅड’ असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे.

- Advertisement -

काय आहे ही शॉर्ट फिल्म

या फिल्मची सुरुवात एका घराच्या बाहेरून होते आणि बॅकग्राऊंडचा आवाज येतो. महत्त्वाचं म्हणजे डान्सिंग अंकल ज्या गाण्यामुळं प्रसिद्ध झाले त्याच गाण्याचा आवाज बॅकग्राऊंडला येतो. त्याच गाण्यामध्ये डान्सिंग अंकलचा प्रवेश होतो. यामध्ये ते आपल्या मुलाबरोबर दिसत आहेत. यानंतरच या कथेला एक वेगळं वळण मिळतं. या शॉर्ट फिल्ममधूनच त्याचा उलगडा होणार आहे. काही महिन्यांपूर्वी डान्सिंग अंकलचा गोविंदाच्या गाण्यावरील एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, त्यानंतर डान्सिंग अंकल एक सेलिब्रिटीच बनले. हा त्याच्या मेहुण्याच्या लग्नातील एक व्हिडिओ होता. या व्हिडिओनंतर अनेक सेलिब्रिटीदेखील या डान्सिंग अंकलचे फॅन्स झाले. त्यामुळं बऱ्याच कार्यक्रमांमध्येही त्यांना बोलवण्यात आलं होतं. या व्हिडिओनंतर सलमान खान, गोविंदा आणि सुनील शेट्टी या तिघांनाही डान्सिंग अंकल भेटू शकले. आता या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये डान्सिंग अंकल काय कमाल दाखवणार याकडेच सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -