घरमनोरंजनपाच वर्षांनंतर अभिनेत्री सौम्या ‘भाबीजी घर पर है’ ही मालिका सोडणार

पाच वर्षांनंतर अभिनेत्री सौम्या ‘भाबीजी घर पर है’ ही मालिका सोडणार

Subscribe

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाबीजी घर पर है.’ या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली असून यातील सर्वच पात्र नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील लक्षवेधी पात्र म्हणजे अनिता भाबी हे पात्र साकारणारी सौम्या टंडन ही देखील नेहमी चाहत्यांच्या चर्चेत असते. मात्र आता या आता अनिता भाबीने पाच वर्षांनंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये निर्मात्या बेनिफर कोहलीने यांनी सौम्या ‘भाबीजी घर पर है’ मालिका सोडत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांपासून सौम्या भाबीजी घर पर है या मालिकेत भूमिका साकारत आहे. ‘माझ्या आयुष्यातील भाबीजी या मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. कोहली आणि संजय जी हे खूप चांगले निर्माते आहेत. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. मी आणि बेनफिर खूप चांगल्या मैत्रीणी आहोत’ असे सौम्याने मालिकेविषयी बोलताना म्हटले आहे.

- Advertisement -

तिने मालिका सोडण्यावर मालिकेच्या निर्मात्या बेनिफर कोहलीने वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी असे सांगितले की, ‘मालिका तर सुरु ठेवायला हवी. सौम्या ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती तिच्या कामात अतिशय हुशार आहे आणि तिच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करु. तिने गेली अनेक वर्षे या मालिकेत भूमिका साकारली आहे आणि आता ती माझी जवळची मैत्रीण आहे’

‘मला तिची खूप आठवण येईल. तसेच आमच्या दोघींमध्ये चागंले मैत्रीचे नाते असल्यामुळे मी तिला तिच्या जागी मालिकेत कोणती अभिनेत्री भूमिका साकारु शकते असेही विचारले आहे. तिने गेली बरीच वर्षे माझ्यासोबत काम केले त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते.’असे ही निर्मात्या व्यक्त होताना म्हणाल्या.


Birthday Special: टॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूडपर्यंतचा रणदीप हुड्डाचा प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -