घरCORONA UPDATEVideo - अखेर शाहरूखच्या ऑफिसचं विलगीकरण कक्षात रूपांतर!

Video – अखेर शाहरूखच्या ऑफिसचं विलगीकरण कक्षात रूपांतर!

Subscribe

वांद्रे येथे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचं चार मजली कार्यालय आहे.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेला मदत मिळावी म्हणून शाहरुखने त्यांच हे कार्यालय पालिकेला क्वॉरंटाइन उपकरणे ठेवण्यासाठी दिलं आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवूडच्या किंग खानने किंग स्टाईलने मदत केली आहे. शाहरूखने कोरोना आजारासाठी लागणारी उपकरणे ठेवण्यासाठी त्याचे वांद्रे येथील कार्यालय पालिकेला दिलं आहे.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेला मदत मिळावी म्हणून शाहरुखने त्यांच हे कार्यालय पालिकेला क्वॉरंटाइन उपकरणे ठेवण्यासाठी दिलं आहे. याचा एक व्हिडीओ गौरी खानने शेअर केला आहे.  शाहरुखचं हे ऑफिस विलगीकरणासाठी तयार झालं असून इमारतीच्या आत कशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.  हे या व्हीडिओत दिसत आहे.

- Advertisement -

वांद्रे येथे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचं चार मजली कार्यालय आहे.  करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिकेला मदत मिळावी म्हणून शाहरुखने त्यांच हे कार्यालय पालिकेला क्वॉरंटाइन उपकरणे ठेवण्यासाठी दिलं आहे. या कार्यालयात लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लागणारी क्वॉरंटाइनची सर्व उपकरणे ठेवण्यात येणार आहेत.

‘या ऑफिसचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. हा क्वारंटाइन झोन असून येथे गरजेच्या सर्व वस्तूंची सोय करण्यात आली आहे. आपल्याला कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्र होऊन लढायचं आहे’, असं कॅप्शन गौरीने या व्हिडीओला दिलं आहे.

- Advertisement -

या कोरोनाच्या काळात शाहरूख शक्य तितकी मदत करत आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० हजार पीपीई किट उपलब्ध करून देणार आहे. मीर फाउंडेशन आणि द अर्थ फाउंडेशनकडून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबियांना एक महिन्याचं जेवण देण्यात येणार आहे. त्याशिवाय दररोज सुमारे दोन हजार लोक जेवू शकतील, असं किचनही तयार करण्यात येणार असल्याची माहिती शाहरुखने दिली आहे.


हे ही वाचा – दिलदार किंग खान! पालिकेच्या मदतीसाठी दिलं चार मजली कार्यालय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -