Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शाहीर - रुचिकाच्या घरी अवतरली 'नन्ही परी'

शाहीर – रुचिकाच्या घरी अवतरली ‘नन्ही परी’

रुचिकाने शुक्रवारी(10 सप्टेंबर) मुलीला जन्म दिला आहे. पण अद्याप दोघांनीही सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये याची अधीकृतपणे घोषणा केली नाहीये.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील(television) लोकप्रिय अभिनेता शाहीर शेखच्या(Shaheer sheikh) घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.(Shaheer sheikh) शाहीर शेखची पत्नी रुचिका कपूरने (Shaheer sheikh wife)गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूड लाइफच्या वृत्तनुसार रुचिकाने (ruchika kapoor)शुक्रवारी(10 सप्टेंबर) मुलीला जन्म दिला आहे. पण अद्याप दोघांनीही सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये याची अधीकृतपणे घोषणा केली नाहीये. मात्र मुलीच्या जन्मामुळे शाहीर अत्यंत आनंदीत झाल्याचे कळतेय.(shaheer sheikh and ruchika kapoor gave birth to a daughter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaheer Sheikh (@shaheernsheikh)

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच या लव्हबर्डने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते आणि अल्पवधीतच हे फोटो व्हायरल झाले होते. वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास शाहीरने महाभारत (Mahabharat)या पौराणिक मालिकेत साकारलेली अर्जूनची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. याव्यतीरीक्त, शाहीरने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच शाहीर नुकतच अभिनेत्री हिना खानसोबत एका म्यूझिक अल्बमध्ये झळकला होता. शाहीरने त्याच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

शाहीरने 2020 साली रुचिकासोबत लग्नगाठ बांधली होती त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोणताही गाजावाजा न करता फक्त निकटवर्तीयांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा देखील त्यांनी रद्द केला.


- Advertisement -

हे हि वाचा – ‘आता मला डान्स क्लासची गरज नाही’, सासूच्या नृत्यावर प्रभावित होत शाहरुख खानची प्रतिक्रिया

- Advertisement -