घरदेश-विदेशआंदोलकर्त्या शेतकऱ्यांमुळे सरकारची नाचक्की, राऊतांचा केंद्रावर निशाणा

आंदोलकर्त्या शेतकऱ्यांमुळे सरकारची नाचक्की, राऊतांचा केंद्रावर निशाणा

Subscribe

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे दिल्लीत या आंदोलनाची धग अद्यापही कायम आहे. अशातचं शिवसेनेनंही आता पुन्हा शेतकरी आंदोनाला पाठींबा दर्शवत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आंदोलकर्त्या शेतकऱ्यांमुळे सरकारची नाचक्की होत असून सरकार दमचक्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागे रेटू शकत नाही अशा शब्दात संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, या काळात किमान १७ वेळा शेतकऱ्यांवर निघृण असे हल्ले राजकीय पक्षांकडून, गुंडांकडून आणि पोलिसांकडून झाले. काही दिवसांपूर्वीच्या आदेशातून स्पष्ट दिसत होते की, शेतकऱ्यांची डोकी फोडा, डोकं फुटलचं पाहिजे. कोण आहे शेतकरी? पण शेतकरी या परिस्थितीतही तिथे उभा आहे… लढतोय…संघर्ष करतोय… मागे हटायला तयार नाही. असे म्हणत, त्यांनी सरकारची संपूर्ण नाचक्की होतेय. सरकार दबावाच्या माध्यमातून मागे रेटू शकत नाही. अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

- Advertisement -

आज मी ऐकतोय सरकार शेतकऱ्यांशी चर्चा सुरु करतयं तर देश त्याचे स्वागत करेल. केंद्राने शेतकरी आंदोलकांशी चर्चा करावी. असेही राऊत म्हणाले.

कोरोना परिस्थितीवरुन फडणवीसांवर हल्लाबोल

कोरोना परिस्थितीवरुन संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांची मागणी सरकारच्या कानापर्यंत गेली असेल. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होईल भविष्यात. याबद्दल मला माहित नाही. शेवठी सरकारने जे निर्बंध घातले आहेत ते केंद्र सरकारच्या सुचनेनुसार घातले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देशाची परिस्थिती माहित आहे. आणि त्यांना परिस्थिती बिघडवायची आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

- Advertisement -

निर्बंध असतानाही लोकं गर्दी करतायतं तरीही सरकार परिस्थिती संयमाने घेत लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतंय. कुठेही जोरजबरदस्ती करत सण-उत्सवाच्या काळात गालबो ट लागता कामा नये. असेही संजय राऊत म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -